कल्याण (kalyan) पश्चिमेतील खडकपाडा परिसरात मंगळवारी रात्री मित्रांसोबत गरबा (garba) पाहायला आलेल्या 15 वर्षीय मुलाचा विजेचा (electrocution) धक्का लागून मृत्यू झाला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण विभागाचे अध्यक्ष उल्हास भोईर यांनी आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवाजवळ हा अपघात झाला. कमलाकर नवले (15) असे मृत मुलाचे नाव आहे. तो खडकपाडा परिसरात कुटुंबासह राहत होता. तो दहावीत शिकत होता.
मंगळवारी रात्री कमलाकर त्याच्या मित्रांसह उल्हास भोईर यांनी आयोजित केलेल्या नवरात्रोत्सवात (navratri) गरबा पाहण्यासाठी आला होता.
गरबा नृत्य व्यवस्थित पाहता यावे म्हणून कमलाकर कार्यक्रमाच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीवर चढला. तिथून तो गरबा डान्स पाहू लागला. बाजूला थेट वीजेच्या तारांचे जाळे होते.
रात्री दहाच्या सुमारास गरब्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर कमलाकर भिंतीवरून खाली उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा तोल गेला. तेथे लटकत असलेल्या जिवंत वीज तारांवर तो तोल जाऊन पडला.
विजेचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. गरबा येथील स्वयंसेवक आणि कमलाकरच्या मित्रांनी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा