व्यापार्‍याने दिली मित्रांना पत्नीच्या शरीरसुखाची मुभा

तीन महिने उलटले तरी सेशन कोर्टाने आरोपी पतीला जामीन दिलेला नाही.

व्यापार्‍याने दिली मित्रांना पत्नीच्या शरीरसुखाची मुभा
SHARES

मुंबईतील एका ४६ वर्षीय व्यापार्‍याला वाईफ स्वॅपिंगच्या (पत्नीची अदलाबदली) आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नराधम व्यापार्‍याने त्याच्या ३९ वर्षीय पत्नीला तीन मित्रांच्या हवाले केले होते. एवढेच नाही तर पत्नीचं शरीरसुख घेण्याचीही आपल्या मित्रांना मुभा देखील दिली होती. नराधम पती सध्या तुरुंगात आहे. आरोपीला अटक होऊन आता तीन महिने उलटले तरी सेशन कोर्टाने आरोपी पतीला जामीन दिलेला नाही.

हेही वाचाः- राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे चंद्रकांत खैरे भडकले

नराधम पती आपला नाद पूर्ण करण्यासाठी पत्नीचा वापर करत होता. तिला वारंवार वासनेची शिकार बनवत होता. तिची अब्रु मित्रांच्या ताब्यात देत होता. समजात अशी वागणूक कोणताही पती आपल्या पत्नीला देत नाही. असे सांगत कोर्टाने नराधमाचा जामीन फेटाळला. पतीने पत्नीचा ईल व्हिडीओ बनवत होता. त्यावरुन पत्नीला ब्लकमेल करून इतर दोन मित्रांसोबत शरीर संबंध प्रस्तापित करायला सांगितले होते. नंतर पतीने पत्नीवर लैंगिक अत्याचार केले होते.

हेही वाचाः- coronavirus update: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णाची संख्या १५ वर

ही घटना २0१७ मध्ये घडली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, पीडित महिलेची मानसिक स्थिती ठिक नसल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीयार्ने घेतलं नाही. बचाव पक्षाच्या वकिलाने कोर्टात पीडित महिलेवर नको ते आरोप केले. महिलेच्या चारित्र्यावरही संशय घेतला. मात्र, कोर्टाने पीडितेची बाजू ऐकून आरोपीचा जामीन फेटाळला. दुसरीकडे, या प्रकरणी पोलिसांनी या खटल्यातील दोन फरार आरोपींनीही जेरबंद केले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा