'पद्मावती'च्या सेटवर मजदूराचा मृत्यू

 Goregaon
'पद्मावती'च्या सेटवर मजदूराचा मृत्यू

गोरेगाव - संजय लीला भंसाली यांच्या पद्मावती चित्रपटाच्या सेटवर एक दुर्दैवी घटना घडलीय. पद्मावती चित्रपटाच्या सेटवर अपघात झाला. या अपघातात एका मजदूराचा मृत्यू झाला. मुकेश बिहारी डाकिया (34 ) असं या व्यक्तीचं नाव आहे. शुक्रवारी सेटवर पेंटिंग करताना पाच फुटाच्या उंचीवरून तो खाली पडला. त्याला कोकिला बेन रुग्णालयात दाखल केलं. पण शनिवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Loading Comments