अपहरण मुंबईत, शोध लागला वाराणसीत

 Nehru Nagar
अपहरण मुंबईत, शोध लागला वाराणसीत

कुर्ला - घराबाहेर खेळत असलेल्या सात वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्या आई वडिलांकडे 15 लाखांची खंडणी मागणाऱ्या एका आरोपीला नेहरू नगर पोलिसांनी वाराणसी येथून अटक केली. किशनकुमार लाचेराम असे या नराधमाचे नाव असून 2 फेब्रुवारीला फुहरान आफताब हा चिमुरडा घराबाहेर खेळत असताना त्याने त्याला खाऊचे अमिष दाखवत अपहरण केले. त्यानंतर त्याला घेऊन हा आरोपी वाराणसी येथे गेला. पोलिसांना आपली माहिती मिळू नये यासाठी त्याने अनेक बनावट सिमकार्ड देखील खरेदी केले होते. या बनावट सिमकार्डवरून त्याने मुलाच्या आई-वडिलांना खंडणीसाठी अनेकदा फोन केला.

नेहरूनगर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत शोध सुरु केला. दरम्यान मोबाईल लोकेशनवरून किशनकुमार लाचेराम वाराणसी रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती नेहरू नगर पोलिसांना मिळाली. त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांची मदत घेऊन मंगळवारी पहाटे वाराणसी रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून आरोपीला अटक करत त्याच्या ताब्यात असलेल्या या मुलाची सुटका केली आहे.

Loading Comments