३ लाचखोर म्हाडा अधिकारी 'एसीबी'च्या ताब्यात

इंटिरिअर डिझायनरकडून ६ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या म्हाडाच्या ३ अधिकाऱ्यांसह एकाला लाच लुचपत प्रतिबंध विभाग(एसीबी)च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.

३ लाचखोर म्हाडा अधिकारी 'एसीबी'च्या ताब्यात
SHARES
इंटिरिअर डिझायनरकडून ६ लाख रुपयांची  लाच मागणाऱ्या म्हाडाच्या ३ अधिकाऱ्यांसह एकाला लाच लुचपत प्रतिबंध विभाग(एसीबी)च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी 'एसीबी'चे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

तक्रारदार हे म्हाडाच्या वांद्रे येथील कार्यालयात इंटिरिअर डिझाईन व रिन्युव्हेशनची परवानगी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी म्हाडाच्या कार्यालयातील के-पूर्व विभागातील कार्यकरी अभियंता, दुय्यम अभियंता, उप अभियंता आणि एकाने तक्रारदारांकडे या परवानग्यांंसाठी तब्बल ६ लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती दोघांमध्ये ४ लाख ५० हजार रुपयांत व्यवहार ठरला. मात्र पैसे देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदारांनी  एसीबीकडे तक्रार नोंदवली.

त्यानुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या चौघांना पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवत तपासाला सुरूवात केली. या प्रकरणी एसीबीचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा-

महाआघाडीची तयारी? राज ठाकरे, शरद पवार यांच्यात ४५ मिनिटे गुफ्तगू

पायल तडवी प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा