Advertisement

बिलात कमिशन मागणारे ४ अधिकारी अटकेत

राज्य सरकारचं मोटार वाहन दुरूस्तीचं वरळी इथं वर्कशाॅप आहे. या वर्कशाॅपमध्ये शासनाची वेगवेगळी वाहने दुरूस्तीसाठी येतात. ही वाहने कंत्राटदारांकडून दुरूस्त करून घेतली जातात. त्यानुसार तक्रारदार कंत्राटदारांनी दुरूस्त केलेल्या वाहनांचं १ लाख ३८ हजार ९४० रुपये इतकं बिल झालं होतं. या बिलाची रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार वरळी येथील वर्कशाॅपमध्ये वारंवार खेपा मारत होते.

बिलात कमिशन मागणारे ४ अधिकारी अटकेत
SHARES
Advertisement

शासनाच्या मोटार वाहन दुरूस्ती वर्कशाॅप मधील वाहनांच्या थकीत बिलाची रक्कम देऊ करण्यासाठी खासगी कंत्राटदारांकडून लाच मागणाऱ्या चौघा अधिकाऱ्यांना लाच लुचपत विभागा(एसीबी)ने रंगेहाथ पकडलं आहे. यांत शासकीय परिवहन सेवा नियंत्रक राजेंद्र महाजन (५०), प्रमुख लिपिक शेख युसुफ मराद मोहम्मद (५६), सचिन गिड्डे (३५) आणि संतोष दराडे (३५) अशा दोन मुख्य यांत्रिकांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण?

राज्य सरकारचं मोटार वाहन दुरूस्तीचं वरळी इथं वर्कशाॅप आहे. या वर्कशाॅपमध्ये शासनाची वेगवेगळी वाहने दुरूस्तीसाठी येतात. ही वाहने कंत्राटदारांकडून दुरूस्त करून घेतली जातात. त्यानुसार तक्रारदार कंत्राटदारांनी दुरूस्त केलेल्या वाहनांचं १ लाख ३८ हजार ९४० रुपये इतकं बिल झालं होतं. या बिलाची रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार वरळी येथील वर्कशाॅपमध्ये वारंवार खेपा मारत होते.

किती मागितली लाच?

ही बिले मंजूर करण्यासाठी तक्रारदारांकडे राजेंद्र महाजन यांनी मिळणाऱ्या रकमेत १० टक्के कमिशन म्हणजेच (१३ हजार ८०० रुपये), तर इतर ३ आरोपींनी बिलात २ टक्के म्हणजेच (८ हजार २८० रुपये) लाच मागितली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारदाराने ‘एसीबी’कडे तक्रार नोंदवली. या प्रकरणी ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून या चौघांना रंगेहाथ पकडल्याची माहिती ‘एसीबी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.हेही वाचा-

'डॅडी'नंतर 'मम्मी' पोलिसांच्या रडारवर!

किरकोळ वादातून लोकलसमोर ढकललं, सीसीटीव्हीतला धक्कादायक व्हिडिओसंबंधित विषय
Advertisement