किरकोळ वादातून लोकलसमोर ढकललं, सीसीटीव्हीतला धक्कादायक व्हिडिओ


किरकोळ वादातून लोकलसमोर ढकललं, सीसीटीव्हीतला धक्कादायक व्हिडिओ
SHARES

किरकोळ वाद सुरू असताना राग अनावर झाल्यामुळे लोकलसमोर ढकलून दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडली. शनिवारी मुलुंड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ३वर ही घटना घडली.


किरकोळ कारणावर झाली बाचाबाची

मुलुंड पश्चिमेला राहणारे ५६ वर्षीय दीपक पटवा हे शनिवारी दुपारी मुलुंड स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरुन प्रवास करण्यासाठी निघाले होते. त्यावेळी एका महिला आणि पुरुषासोबत त्यांची बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला, की या दोघांनी पटवा यांना थेट  समोरून येणाऱ्या लोकलसमोर ढकलून दिलं.


 


जागीच सोडले प्राण

लोकलखाली आल्यामुळे पटवा यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी कलम ३०२ अंतर्गत हत्येचा गुन्हा नोंदवला असून या अज्ञात आरोपींचा पोलिस शोध घेत असल्याचं वरीष्ठ पोलिस निरीक्षक बळवंतराव यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.हेही वाचा

लोकलचा प्रवास जिवावर बेतला; एकीचा मृत्यू, तर दुसरी गंभीर जखमी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा