विक्रोळीत भरधाव ट्रकची स्विफ्टला धडक, तिघेजण गंभीर

 Vikhroli
विक्रोळीत भरधाव ट्रकची स्विफ्टला धडक, तिघेजण गंभीर
Vikhroli, Mumbai  -  

विक्रोळीत पूर्व द्रूतगती महामार्गावर एका भरधाव ट्रकने स्विफ्ट कारला मागून जोरदार धडक दिल्याने ही कार समोर उभ्या असलेल्या डंपरवर जाऊन आदळली. या अपघातात कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्तांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिघांपैकी दोघांची प्रकृती नाजूक असल्याचे रुग्णालयातील सूत्रांकडून सांगितले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता झाला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक फरार झाला. या अपघाताची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली असून पोलीस फरार ट्रकचालकाचा शोध घेत आहेत. शिवाय रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या डंपरच्या मालकाचाही शोध सुरू आहे.

Loading Comments