वासनांध देबाशिषने केली तरूणीची हत्या

विलेपार्ले - 24 वर्षीय फिजिय़ोथेरेपिस्टची हत्या करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती पूढे आली आहे. अटक आरोपी देबाशिष धारा हा विकृत मानोवृतीचा वासनांध व्यक्ति असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याला लोकांच्या घरामध्ये डाेकावून महिलांना बघण्याची सवय होती. हा गुन्हा घडला त्या दिवशी तो असाच डोकावत असताना 5 डिसेंबरच्या रात्री ही 24 वर्षीय तरुणी आपल्या घरी एकटीच झोपली असल्याचे त्याने पाहिले. घराचा दरवाजा उघडा होता आणि त्याचीच संधी या नराधमाने साधली आणि हा नराधम त्या तरुणीच्या घरात घुसला. या नराधमाने तिची हत्या करून तिच्यावर बलात्कार केल्याचे अधिक तपासात उघड झाले आहे.

Loading Comments