पल्लवी पूरकायस्थ हत्येतील अारोपीला तुरूंगात सवलती नाकारल्या; पॅरोलवर असताना केले पलायन

वडाळा येथे राहणाऱ्या पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीची ९ अाॅगस्ट २०१२ रोजी तिच्याच इमारतीतील सज्जाद या सुरक्षारक्षकाने हत्या केली. सज्जाद याने बलात्काराचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यानंतर त्याने तिची हत्या करुन पळ काढला होता.

पल्लवी पूरकायस्थ हत्येतील अारोपीला तुरूंगात सवलती नाकारल्या;  पॅरोलवर असताना केले पलायन
SHARES

वकील पल्लवी पूरकायस्थ हत्याप्रकरणातील आरोपीला न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला एका वर्षाचा कारागृह आणि पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. मात्र, पॅरोलवर असताना पलायन केल्यामुळे न्यायालयाने त्याला ब्लॅक लिस्टेड केलं अाहे. कैद्यांना मिळणाऱ्या इतर सवलतीपासून आता त्याला वंचित ठेवले असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली अाहे. 


२०१२ मधील घटना

वडाळा येथे राहणाऱ्या पल्लवी पूरकायस्थ या वकील तरुणीची ९ अाॅगस्ट २०१२ रोजी तिच्याच इमारतीतील  सज्जाद या सुरक्षारक्षकाने हत्या केली. सज्जाद याने बलात्काराचा प्रयत्न केला. त्याला विरोध केल्यानंतर त्याने तिची हत्या करुन पळ काढला होता. मुंबई पोलिसांनी एका दिवसात त्याला मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून पकडले होते. या प्रकरणी सज्जादला न्यायालयाने जुलै २०१४ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्याला नाशिक तुरुंगात ठेवण्यात आले होते. 


पॅरोलवर असताना पलायन

फेब्रुवारी २०१६ मध्ये त्याची आईला गंभीर आजार झाल्याने न्यायालयाने त्याला ३० दिवसांच्या पॅरोलवर सोडले. मात्र, पॅरोलवर बाहेर आलेला सज्जाद पळून गेला. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात भादंवि कलम २२४ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिस दलातील गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी संजय निकम यांच्या पथकाने जम्मूत तब्बल एक महिना पाळत ठेवून सज्जादला अटक केली.


२५ वर्ष कारागृहात

 या प्रकरणी सज्जादला न्यायदंडाधिकारी एम.आर. यादव यांनी दोषी ठरवत एक वर्षांचा कारावास व पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसंच माफीच्या प्रक्रियेतून त्याला ब्लॅक लिस्टेड करण्यात आले. चांगल्या वागणूकीसाठी दर महिन्याला शिक्षेतील सात दिवस कमी होतात. तसंच वागणुकीच्या वार्षिक अहवालानुसार आणखी ३० दिवस शिक्षेतून कमी केले जातात. त्यामुळे दरवर्षी शिक्षेतून ११४ दिवस कमी केले जातात. मात्र, ही सवलत आता सज्जादला मिळणार नाही. त्याचे नावही नाशिक कारागृहातील माफी नोंदवहीतून वगळलं आहे. त्यामुळे त्याला आता कमीतकमी २५ वर्ष कारागृहात काढावे लागणार आहेत. हेही वाचा - 

अभिनेता अरमान कोहली पुन्हा अडचणीत

मोबाइलमुळे सापडला हत्येतील आरोपी; दिल्लीतून जेरबंद
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा