मास्क न घातल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ७४ जणांवर नोंदवले गुन्हे

पूर्व मुंबईत १६ जणांवर, पश्चिम उपनगरात ५ जणांवर, तर उत्तर मुंबईत हे सध्याचे कोरोनाचे हाँसस्पाँट असताना या ठिकाणी ४७ जणांवर मास्क न घातल्याप्रकरणी कारवाई पोलिसांनी केली आहे.

मास्क न घातल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी ७४ जणांवर नोंदवले गुन्हे
SHARES

मुंबईत कोरोनाचे दिवसेंदिवस नवे रुग्ण समोर येत असल्याने चिंताजनक वातावरण आहे. त्यामुळे शहरात मास्क वापरणे सक्तीचे असताना ही काही बेजबाबदार लोकांकडून मास्क घातले जात नव्हते. अशांवर पोलिसांनी थेट गुन्हे नोंदवण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारी पोलिसांनी शहरात तब्बल ७४ जणांवर मास्क न घातल्या प्रकरणी कारवाई केली आहे. या सर्वांवर १८८ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे नोंदवण्यात आल्यीच माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचाः- म्हणून गणपती मंडळांकडून पालिका लिहून घेणार ‘विशेष हमीपत्र’

मुंबईत सध्या कोरोनाची दहशत असतानाच, खबरदारी म्हणून तोडांला मास्क लावा असे सांगून देखील काही बेशिस्त नागरिक मास्क न वापरता फिरायचे अशा मास्क न वापरणाऱ्यां आतापर्यंत २६५२ जणांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असताना नागरिकांनी अशाप्रकारे वावरणे म्हणजे आजाराला आमंत्रण देण्याप्रमाणेआहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत दक्षिण मुंबईत मास्क न घातल्याप्रकरणी ६ जणांवर कारवाई केली आहे. पूर्व मुंबईत १६ जणांवर, पश्चिम उपनगरात ५ जणांवर, तर उत्तर मुंबईत हे सध्याचे कोरोनाचे हाँसस्पाँट असताना या ठिकाणी ४७ जणांवर मास्क न घातल्याप्रकरणी कारवाई पोलिसांनी केली आहे.  त्या शिवाय ५ पेक्षा जास्त व्यक्ती जमल्या प्रकरणी ७ हजार ६९२ जणांवर कारवाई कली आहे. तर कलम १८८ चे उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत१३ हजार ८६२ जणांवर गुन्हे नोंदवलेले आहेत. नागरिकांनी गरजे व्यतिरिक्त बाहेर पडू नये, पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकञ जमू नये, तसेच तोंडाला मास्क वापरणे सक्तीचे केले असताना. अनेकदा बेशिस्त नागरिक   या नियमांची पायमल्ली करताना दिसतात.

हेही वाचाः- कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, ५९६ कैद्यांना कोरोना

माञ पोलिसांनी वेळोवेळी उचललेल्या पाऊलांमुळे आता त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत असले.  तरी काही ठिकाणी बेशिस्त नागरिक प्रसंगाचे गांभीर्य न ओळखता बिनदिक्कत फिरताना दिसत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असली, तरी पूर्णतहा लाँकडाऊन उठवलेला नाही, त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांनो सावधान, अवैध वाहतूकीप्रकरणी राज्यात पोलिसांनी आतापर्यंत ८९ हजार ४५९ जणांची वाहने आतापर्यंत जप्त केलेली आहेत. तर लाँकडाऊनच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात १ लाख ६१ हजार ८२१ गुन्हे नोंदवलेले आहेत.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा