सलमान खानची रवानगी तुरूंगात, काळवीट शिकारप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा


सलमान खानची रवानगी तुरूंगात, काळवीट शिकारप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा
SHARES

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जोधूपर सत्र न्यायालयाने काळवीट शिकार प्रकरणी सकाळीच सलमानला वन्यजीव संरक्षण अधिनियम ९/५२ च्या कलम ९/५ अंतर्गत दोषी ठरवलं होतं. त्यानंतर सरकारी वकील आणि सलमानच्या वकिलांमध्ये शिक्षेवर प्रतिवाद सुरू होता. सरकारी वकिलांनी त्याला ६ वर्षांची शिक्षा देण्याची मागणी केली होती.


६ वर्षांच्या शिक्षेची मागणी

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर सलमान खानला अखेर ५ वर्षांची शिक्षा सुनावणी. वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत दोषी व्यक्तीला कमीत कमी १ वर्ष आणि जास्तीत जास्त ६ वर्षांची शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे.


'या' चौघांची निर्दोष सुटका

राजस्थानमध्ये १९९८ मध्ये 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान जोधपूरजवळच्या कांकणी गावाजवळ दोन काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी सलमानला न्यायालयाने दोषी ठरवलं, तर अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम या सहआरोपींची निर्दोष सुटका केली.

तब्बल २० वर्षांनंतर गुरुवारी या खटल्यातील अंतिम युक्तिवाद २८ मार्चला पूर्ण झाला. त्यानंतर सलमान खान बुधवारी खासगी विमानाने मुंबई विमानतळाहून जोधपूरला निघाला. जोधपूर न्यायालयाने या खटल्याचा अंतिम निकाल गुरुवारी सुनावला.


काय आहे संपूर्ण प्रकार?

२० वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या सिनेमाच्या शूटिंगसाठी सलमानसह इतर कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. दरम्यान १ आणि २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री हे सर्वजण एका जिप्सी कारमध्ये होते. ती कार सलमान चालवत होता. त्यावेळी काळवीटांचा एक कळप दिसताच सलमाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. 

त्यात संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांचा मृत्यू झाला. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटांची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात किमान १ वर्ष आणि जास्तीत जास्त सहा वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.



हेही वाचा-

'या' कारणामुळे सलमान दोषी आढळला



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा