ही तर आता नराधमांची भूमी, पालघर हत्याप्रकरणी सुमीत राघवन संतापला

पालघर जिल्ह्यातील हत्याप्रकरणी अभिनेता सुमीत राघवन प्रचंड संतापला आहे.

ही तर आता नराधमांची भूमी, पालघर हत्याप्रकरणी सुमीत राघवन संतापला
SHARES

पालघर जिल्ह्यातील हत्याप्रकरणी अभिनेता सुमीत राघवन प्रचंड संतापला आहे. यापुढे महाराष्ट्र ही नराधमांची भूमी आहे असं म्हणणं जास्त योग्य ठरेल, अशा शब्दात सुमितने या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. पालघर जिल्ह्यात जमावानं तीन प्रवाशांना चोर समजून दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना मागील गुरूवारी घडली. या घटनेचे आता राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. अभिनेता सुमीत राघवनने ट्टिट करत आपल्या मनातील संताप व्यक्त केला आहे.  

मी सुन्न झालोय. जे घडलं ते अत्यंत भीषण, भीतिदायक, लाजिरवाणं आहे. यापुढे महाराष्ट्र ही संतांची, वीरांची भूमी आहे असं बोलण टाळूया. याउलट ही नराधमांची भूमी आहे असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. ही घटना महाराष्ट्राच्या प्रतिमेला लागलेला काळा डाग आहे, असं ट्टिट सुमीतने केलं आहे. 

या ट्वीटमध्ये सुमीतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पालघर पोलीस यांना टॅग केलं आहे. सुमीतने सलग तीन ट्वीट केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये तो म्हणाला की, मी तो व्हिडिओ पाहिला नसता तर बरं झालं असतं. आता ती दृष्य माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीत. एखाद्या म्हाताऱ्या माणसाची जमाव दगडी मारून हत्या कशी करू शकतं. म्हाताऱ्याचं संरक्षण करण्याऐवजी पोलीस त्यांच्यापासूनच लांब पळत होते. आपण कुठे चाललोय हा प्रश्न आता माझ्या डोक्यात पुढील अनेक वर्ष घोळत राहणार आहे.






हेही वाचा -

पालघरमध्ये चोर समजून तिघांची दगडानं ठेचून हत्या

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४२०० वर




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा