#Metoo: केट शर्माची सुभाष घईंविरोधात पोलिसांत तक्रार

घई यांनी तिला बॉडी मसाज करण्यास सांगितलं. बॉडी मसाज देण्यासाठी केट हात घुण्यास गेली तेव्हा त्यांनी तिला दुसऱ्या खोलीत बोलावलं. यावेळी जबरदस्तीने केटचं चुंबन घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

SHARE

मी टू चळवळीने बाॅलीवूडला हादरवून सोडलं अाहे. एकापाठोपाठ एक मोठ्या सेलिब्रिटींवर लैंगिक शोषणाचे अारोप केले जात अाहेत. ही यादी अाता वाढतच अाहे. या यादीत अाता अाणखी नाव जोडलं गेलं अाहे. ते म्हणजे शो मॅन सुभाष घई यांचं. निर्माता अाणि दिग्दर्शक सुभाई घई यांच्याविरोधात अभिनेत्री केट शर्माने वर्सोवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली अाहे.

 ६ अाॅगस्ट रोजी अापल्या वाढदिवसाच्या पार्टीत सुभाई घई यांनी जबरदस्तीने अापलं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, असा अारोप केटने केला अाहे. दरम्यान, सुभाष घई यांच्यावर अाधीही एका महिलेने लैंगिक शोषणाचा अारोप केला अाहे.


बॉडी मसाजसाठी सांगितलं

याप्रकरणी केट शर्माने प्रसारमाध्यमांना सांगितलं की, ६ अाॅगस्ट रोजी तिचा वाढदिवस होता. सुभाष घई यांनी केटला वाढदिवसाची पार्टी देण्याच्या बहाण्याने बोलावलं. या पार्टीत ७ ते ६ इतर लोकही होते. यावेळी घई यांनी तिला बॉडी मसाज करण्यास सांगितलं. बॉडी मसाज देण्यासाठी केट हात घुण्यास गेली तेव्हा त्यांनी तिला दुसऱ्या खोलीत बोलावलं. यावेळी जबरदस्तीने केटचं चुंबन घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला.


अारोप खोटा 

सुभाष घई यांनी मात्र केटचा अारोप खोटा असल्याचं म्हटलं अाहे. ट्टीट करून घई म्हणाले की,  निश्चितपणे मी टू अभियान अाणि महिला सशक्तिकरणाला माझा पाठिंबा अाहे. मात्र, चुकीच्या पद्धतीने याचा फायदा घेणाऱ्या लोकांना ही छोटी प्रसिद्धी पचणार नाही. जर कोणी माझ्या प्रतिष्ठेला नुकसान पोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर याचं मला खूप  दुःख अाहे. हे प्रकरण अाता माझे वकील पाहतील. दरम्यान, सुभाष घई यांनी अापल्या एेतराज या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी केटला साइन केले होते. हेही वाचा -

#Metoo: आलोक नाथ अाणखी अडचणीत; संध्या मृदूल यांचाही गैरवर्तनाचा अारोप

अमिताभ यांच्यावर गैरवर्तनाचे अारोप करणारे मेसेज खोटे - सयाली भगत
संबंधित विषय
ताज्या बातम्या