एजाज लकडावाला 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

२३ वर्षापूर्वी वैद्यकिय तपासणीसाठी त्याला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात आणले असताना पोलिसांना हुलकावणी देऊन एजाज लकडावालाने पळ काढला होता.

एजाज लकडावाला 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात
SHARES

कुख्यात गुंड एजाज लकडावाला याला तब्बल २३ वर्षानंतर अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. एजाजविरोधात हत्या, खंडणीसारख्या ८०  हून अधिक तक्रारी असून मुंबईत २५ गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच एजाजची मुलगी सोनिया अडवानी हिला अटक केली होती. तिच्या चौकशीतून एजाजचा थांगपत्ता लागला आहे.

जोगेश्वरीच्या अमृतनगरमध्ये राहणाऱ्या एजाजवर तो अल्पवयीन असतानाच पहिला गुन्हा नोंदवण्यात आला होता. शाळेत असताना त्याने त्याच्या शिक्षिकेला मारहाण केली होती. त्यानंतर एजाज परिसरात छोट्या - मोठ्या चोरी आणि मारामाऱ्या करू लागला. त्यावेळीच  'डी गँग'ची नजर त्याच्यावर पडली. पुढे राजनच्या सांगण्यावरून तो सुपाऱ्या घेऊ लागला. पायधुनी पोलिस ठाण्यात एजाजवर २ हत्येच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यात तो अटकेत असताना १९९७ मध्ये त्याला नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीसाठी त्याला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात आणले असताना पोलिसांना हुलकावणी देऊन त्याने पळ काढला होता.  

त्या दिवसापासून पोलिस त्याच्या मागावर होते. त्यामुळे एका ठिकाणी स्थिर न राहता एजाज वारंवार आपली जागा बदलायचा. वेगवेगळ्या नावाने एजाज तब्बल ७ ते ८ देशात वावरत होता. २००० मध्ये मुंबई पोलिसांनी कुख्यात गुंडांविरोधात रान उठवले असताना२००६  मध्ये एजाजने त्याच्या कुटुंबियांना परदेशात हलवण्याचे ठरवले. बनावट कागदपत्रांच्या मदतीने तो त्याची पत्नी उमा थडानी, मुलगा आणि मुलीला परदेशात नेण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पोलिसांनी त्याचा डाव हाणून पाडला. त्यावेळी त्याच्या संपूर्ण कुटुंबावर २००६ मध्ये बनावट पासपोर्ट प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी त्याने त्याच्या पत्नीचे नाव उमा थडानी बदलून रेखा अडवानी हे नाव पासपोर्टवर नोंदवले होते.

 १९९३ च्या स्फोटानंतर छोटा राजन आणि दाऊद यांच्यात वैमनस्य आले. त्यावेळी एजाज राजनसोबत वेगळा झाला होता. मात्र डी कंपनीकडून वाढता धोका पाहता त्याने राजनच्या परवानगीनेच स्वत:ची वेगळी टोळी बनवली. मात्र तरीही एजाज राजनसाठी अधूनमधून काम करायचा. मात्र पोलिसांनी त्याच्या टोळीतील महत्वाच्या म्होरक्यांची धरपकड केल्यानंतर मुंबईतील त्याचे वर्चस्व कमी झाले होते. त्यातच  फेब्रुवारी २०१९ मध्ये खंडणी विरोधी पथकाने एजाजचा भाऊ अखिल युसूफ लकडावाला याला हाजीअली येथून अटक केली. 

लकडावालाची मुलगीअखिलच्या चौकशीनंतर मुंबईत वास्तव्यास असलेल्या एजाजच्या कुटुंबियांचा पोलिसांना थांगपत्ता लागला. तपासात एजाजची मुलगी भारतातून त्याला माहिती देत असायची.त्यानुसार लकडावालाची मुलगी सोनिया मनीषा अडवानी (लग्नानंतरचे नाव) हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावली होती. २७ डिसेंबर रोजी सोनिया आपल्या दीड वर्षाच्या मुलासोबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नेपाळला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने तिला अटक करत तिचा ताबा मिळवला.

लकडावालाला अटक केलेले पोलीस पथकतिच्या मोबाइल डिटेल्सनुसार ती एजाज लकडावाशी दररोज फोनवर बोलायची. लकडावाला परदेशात असताना तो मुलीशी रात्री ३ वाजता बोलायचा. मात्र भारतात आल्यानंतर भारतीय वेळेनुसार बोलू लागला. त्यावेळी पोलिसांनी एजाज भारतात आल्याचा अंदाज बांधला. मुलीच्या मोबाइलमध्ये मिळालेल्या विविध नंबरमधून तो बिहारच्या पटना येथे लपला असल्याची माहिती २७ डिसेंबर रोजी पोलिसांना मिळाली. त्यानुसार बिहार पोलिसांच्या मदतीने खंडणी विरोधाचे पोलिस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे भाऊ आणि मुलीच्या अटकेनंतरही एजाज पैशांसाठी व्यावसायिकांना धमकावतच होता. ३ जानेवारी रोजी त्याने खारमधील एका व्यावसायिकाला धमकावले. पोलिसांनी त्या नंबरचा माग काढला आणि एजाजचे लोकशेन  पोलिसांना कळाले. पोलिस मागावर असल्याची माहिती मिळाल्यानंतर एजाज पुन्हा भारताबाहेर पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानात मुंबई पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.



हेही वाचा-

दाऊदचा हस्तक गँगस्टर एजाज लकडावालाला अटक




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा