मनसेच्या मदतीनं २३ बांगलादेशींवर कारवाई

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हाकलण्यासाठी ९ तारखेला मोर्चा काढला होता. त्यानंतर पोलिसांनी ही धडक करवाई केलीय.

मनसेच्या मदतीनं २३ बांगलादेशींवर कारवाई
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हकलण्यासाठी काढलेल्या मोर्चानंतर विवार इथल्या बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली आहे. विरार पश्चिमेकडील अर्नाळा सागरी पोलिस ठाण्या अंतर्गत दहशदवाद विरोधी पथक आणि मानवी तस्करी विरोधी शाखेनं कारवाई करत २३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांना मनसेची मदत

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घुसखोर पाकिस्तानी आणि बांगलादेशींना हाकलण्यासाठी ९ तारखेला मोर्चा काढला होता. त्यानंतर पोलिसांनी ही धडक करवाई केलीय. याबाबतची माहिती मनसेच्या स्थानिक शाखेनं पोलिसांना दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

२३ बांगलादेशी अटकेत

मानवी तस्करी विरोधी विभागाच्या पालघर शाखेचे महेश गोसावी यांना अर्नाळा विभागात बांगलादेशी असल्याची खबर मिळाली होती. पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे, दहशदवाद विरोधी पथकाचे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या मदतीनं २३ बांगलादेशींना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये १० महिला, १२ पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

बांगलादेशी मराठी शिकलेले

सर्व बांगलादेशी भंगारचा व्यवसाय आणि मोलमजुरी करण्यासाठी आले होते, असं पोलीस तपासात उघड झालंय. या बांगलादेशींनी मराठीही शिकून घेतल्याचं स्पष्ट झालंय. मंगळवारी रात्री ११ वाजल्यापासून ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पहाटे ४ वाजता अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा

मुंबईत २४ तासात पतीने पत्नीची हत्या केल्याच्या दोन घटना

उर्वशी चुडावालाला न्यायालयाचा दिलासा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा