लग्नासाठी तगादा लावलेल्या प्रेयसीची मित्रांच्या मदतीने केली हत्या

लग्नासाठी तगादा लावलेल्या प्रियसीचे अपहरण करून तिची निर्घुन हत्या करणाऱ्या प्रियकरासह तिच्या दोन साथीदारांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. रोहिणी घोरपडे असे या मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी सुनिल शिर्के, विजयसिंह मोरे, राम जाधव या तिघांना अटक केली आहे. तरुणीची हत्या करून या तिघांनी तिचा मृतदेह रायगडच्या ता. माणगाव येथील शिरसाड या गावी पुरून ठेवला होता.

लग्नासाठी तगादा लावलेल्या प्रेयसीची मित्रांच्या मदतीने केली हत्या
SHARES

लग्नासाठी तगादा लावलेल्या प्रियसीचे अपहरण करून तिची निर्घुन हत्या करणाऱ्या प्रियकरासह त्याच्या दोन साथीदारांना मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे. रोहिणी घोरपडे असे या मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी सुनिल शिर्के, विजयसिंह मोरे, राम जाधव या तिघांना अटक केली आहे. तरुणीची हत्या करून या तिघांनी तिचा मृतदेह रायगडच्या ता. माणगाव येथील शिरसाड या गावी पुरून ठेवला होता.


काय आहे प्रकरण ?

मानखुर्दच्या ज्योतिर्लिंगनगर परिसरात राहणारी रोहिणी वाशी महानगर पालिका रुग्णालयात कंत्राटी कामगार म्हणून कामाला होती. 14 नोव्हेंबर 2018 रोजी रोहिणी मैत्रिणीच्या लग्नाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली. ती पून्हा घरी परतलीच नाही. त्यामुळे रोहिणीचा मावस भाऊ राजेंद्र मोहिते याने 16 नोव्हेंबर 2018 रोजी रोहिणी बेपत्ता झाल्याची तक्रार मानखुर्द पोलिस ठाण्यात नोंदवली. बेपत्ता रोहिणीचा माग काढत असताना. रोहिणीचे तिचा कामावरील मित्र सुनिल शिर्के याच्यासोबत प्रेमसंबध असल्याची महिती पोलिसांना मिळाली. तसेच बेपत्ता रोहिणीच्या बँक खात्यातून ही 65 हजार रुपये काढल्याचे तपासात निष्पन्न झाले. हे पैसे ज्या एटीएम मशीन मधून काढले. त्या एटीएम मशीनच्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात पैसे काढणाऱ्याचा चेहरा अस्पष्ट दिसत असल्यामुळे पोलिसांच्या तपासाला खिळ बसली होती.


सीसीटिव्हींमुळे पटली ओळख

एटीएम मशीन ज्या परिसरातील शेकडो सीसीटिव्ही कॅमरे तपासल्यानंतर ते पैसे राम जाधव याने काढल्याचे पुढे आले. तसेच त्या दोन दिवसात राम हा सुनिलच्या वारंवार संपर्कात असल्याचे ही आढळून आले. राम हा कौपरखैराने परिसरात केबल चालकाकडे कामाला होता. पोलिसांनी त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता. राम हा त्याच्या मूळ गावी सातारा  येथे गेल्याचे कळाले. पोलिसांना मोबाइल टाँवर लोकेशनच्या मदतीने राम, सुनिल, रोहिणी हे तिघेही सुनीलच्या गावी एकत्र गेल्याचे सिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी राम आणि सुनिलला अटक केली. दोघांच्या चौकशीतून विजयसिंह मोरे हा ही या हत्येच्या कटात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. विजयसिंह हा बेस्ट बस चालक असून रोहिणी, सुनिल, राम हे ज्या गाडीतून सुनिलच्या गावी जात होते. त्या गाडीचा चालक हा विजयसिंह होता हे तपासात निष्पन्न झाले.


घरातल्यांच्या विरोधामुळे रोहिणीची केली हत्या

या तिघांनी रोहिणीला सुनिलच्या रायगडच्या ता. माणगाव येथील शिरसाड येथील गावी नेले. त्यानंतर तिच्या डोक्यात फावडा, काठ्या मारून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्याच साडीच्या मदतीने तिचा गळा आवळून रोहिणीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह एका खड्यात पुरला. हा खड्डा सुनिलने दोन दिवसांपूर्वीच खोदल्याची कबूलीही सुनिलने पोलिसांना दिली. प्रेमसंबधातून रोहिणीने लग्नासाठी तगादा लावला होता. त्यातून घरात भांडणे होत असल्याने रोहिणीचा मित्रांच्या मदतीने काटा काढल्याची कबूली पोलिसांना दिली. तब्बल दोन महिन्यानंतर पोलिसांनी माणगाव येथे जाऊन खडयात पुरलेला रोहिणीचा मृतदे ताब्यात घेतला.  रोहिणीचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी जे.जे.रुग्णालयात पाठवला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा