आंतरराष्ट्रीय विमानतळावर चौघांवर कारवाई

 Pali Hill
आंतरराष्ट्रीय विमानतळावर चौघांवर कारवाई

सहार - आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागानं तीन वेगवेगळ्या कारवायांत चौघाना अटक केली आहे. सोराब अली, हारुन शहीद पटेल, फिरोज इराकी आणि अब्रार नाईक अशी या चौघांची नावं आहेत. रियाधहून येणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानातून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला होता. हालचाली संशयास्पद वाटल्यानं सोराब अलीला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडे 6 सोन्याचे बार सापडले. त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारातली किंमत 17 लाख 77 हजार 431 रुपये आहे.

दुसऱ्या घटनेत जोहान्सबर्ग येथून आलेल्या विमानातून हारुन शहीद पटेल हा प्रवासी विमानतळावर दाखल झाला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे जुने आणि वापरलेले 65 आयफोन सापडले, ज्यांची किंमत 14 लाख 10 हजार रुपये असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तिसऱ्या घटनेत आंतरराष्ट्रीय विमानतळाहून दुबईला निघालेल्या फिरोज इराकी आणि अब्रार नाईक यांच्याकडे भारतीय चलनातील 2 हजार रुपयांच्या 4 लाख 90 हजारांच्या नवीन नोटा सापडल्या. तरी या दोघांकडे एवढी मोठी रक्कम कशी आली, याचा तपास हवाई गुप्तचर यंत्रणेनं सुरू केला आहे.

Loading Comments