'विमान हायजॅक'च्या धमकीमुळे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ

मुंबईतील एअर इंडियाच्या ऑपरेशन सेंटरमध्ये 'विमान हायजॅक' करण्याची धमकी देणारा फोन आला आहे. या एका फोनमुळे देशातल्या सर्व विमानतळांना खबरदारीचा उपाय म्हणून अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

'विमान हायजॅक'च्या धमकीमुळे विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ
SHARES

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतल्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकांवर आगामी तीन महिन्यांत दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा भारताच्या गुप्तचर संघटनांनी दिला आहे. त्यामुळं गर्दीच्या सर्व रेल्वे स्थानकांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करतअतिदक्षेचा इशारा जारी करण्यात आला होता. अशातच आता मुंबईतील एअर इंडियाच्या ऑपरेशन सेंटरमध्ये 'विमान हायजॅक' करण्याची धमकी देणारा फोन आला आहे. या एका फोनमुळे देशातल्या सर्व विमानतळांना खबरदारीचा उपाय म्हणून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच, फोन करणाऱ्या व्यक्तीनं 'एक फ्लाइट हायजॅक करून पाकिस्तानात नेण्यात येईल’, असं सांगितलं आहे.

अतिदक्षतेचा इशारा

एअर इंडियाच्या ऑपरेशन नियंत्रण कक्षात शनिवारी हा धमकीचा फोन आला. त्यावेळी 'एका भारतीय एअरलाइन्सच्या विमानाला हायजॅक करून ते पाकिस्तानात नेण्यात येणार आहे,' असं दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं. त्यामुळे देशातल्या सर्व विमानतळांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, विमानात बसणाऱ्या सर्व प्रवाशांची कसून तपासणी करण्यात येत आहे.


कडेकोट तपासणी

धमकीच्या फोनमुळे ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS)ने सर्व विमानतळांना खबरदारीचे निर्देश जारी केले आहेत. यामध्ये विमानात बसणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. कार पार्किगमध्ये जाणाऱ्या गाड्यांची, प्रवासी, कर्मचारी, सामान, कॅटरिंग आदींची कडेकोट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विमानतळावरील सुरक्षा वाढवणे, क्विक रिअॅक्शन पथके तैनात करणे आदींचा यात समावेश करण्यात आला आहे.


कडक सुरक्षा

हा फोन बनावट किंवा खोडकर असू शकतो. मात्र, नुकताच झालेल्या पुलवामा हल्ल्यामुळे सुरक्षा एजन्सीज अशा कोणत्याही धमकीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तसंच, पुलवामा हल्ल्यानंतर सर्व ठिकाणच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणं, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (CISF) ने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली होती. परंतू या धमकीच्या फोनमुळे त्या सुरक्षा व्यवस्थेत आणखी वाढ करण्यात आली आहे.



हेही वाचा -

वूटवर अतुल सॅाल्व्ह करणार 'द सवाईकर केस'

छोट्या पडद्यावर येतंय 'एक घर मंतरलेलं'



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा