सोहराबुद्दीन चकमकप्रकरणी शहा यांना दिलासा

विशेष सीबीआय न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणात अमित शहा यांना दोषमुक्त केलं होतं. एवढंच नाही, तर सीबीआयने या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देखील दिलं नव्हतं. सीबीआयच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘बॉम्बे लॉयर्स असोसिएशन’ने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सोहराबुद्दीन चकमकप्रकरणी शहा यांना दिलासा
SHARES

'बॉम्बे लॉयर्स असोसिएशन'ची याचिका फेटाळून मुंबई उच्च न्यायालयाने सोहराबुद्दीन चकमकीप्रकरणी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना शुक्रवारी दिलासा दिला आहे. याचिकाकर्त्यांकडे याप्रकरणी ठोस मुद्दा नसल्याचं सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

मुंबई उच्च न्यायालयात याचिका

विशेष सीबीआय न्यायालयाने डिसेंबर २०१४ मध्ये सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकप्रकरणात अमित शहा यांना दोषमुक्त केलं होतं. एवढंच नाही, तर सीबीआयने या निर्णयाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देखील दिलं नव्हतं. सीबीआयच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘बॉम्बे लॉयर्स असोसिएशन’ने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

निर्णयाला आव्हान देण्याची मागणी

या याचिकेच्या माध्यमातून न्यायालयाने सीबीआयला विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु असोसिएशनकडे याप्रकरणी ठोस पुरावे नसल्याने न्यायालयाने ही याचिका फेटाळली.

काय आहे सोहराबुद्दीन प्रकरण?

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा सोबत संबंध असल्याचा दावा करत गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने सोहराबुद्दीन आणि त्याची बायको कौसर बी यांना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने पकडल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सोहराबुद्दीनला नोव्हेंबर २००५ मध्ये गांधीनगरजवळील एका चकमकीत ठार मारण्यात आलं होतं. या बनावट चकमकीचं नियोजन करण्यात गुजरातचे तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा यांचा हात असल्याचा आरोप होता.हेही वाचा-

अमित शहा-भागवत यांच्यात गुफ्तगू

बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद निकाली, जयदेव ठाकरेंनी घेतली याचिका मागेRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा