Advertisement

बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद निकाली, जयदेव ठाकरेंनी घेतली याचिका मागे

बाळासाहेबांच्या मृत्युपत्रातील मजकुरावर आक्षेप घेत जयदेव ठाकरे न्यायालयात गेले होते. पण आता अखेर हा वाद संपुष्टात आला आहे. जयदेव ठाकरे यांनी आपली याचिका शुक्रवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे असणार आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद निकाली, जयदेव ठाकरेंनी घेतली याचिका मागे
SHARES

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर काही महिन्यांतच त्यांच्या संपत्तीवरून भाऊबंदकी सुरू झाली. बाळासाहेबांच्या संपत्तीवरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरू झालेला वाद शेवटी मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात गेला. बाळासाहेबांच्या मृत्युपत्रातील मजकुरावर आक्षेप घेत जयदेव ठाकरे न्यायालयात गेले होते. पण आता अखेर हा वाद संपुष्टात आला आहे. जयदेव ठाकरे यांनी आपली याचिका शुक्रवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे असणार आहेत.


म्हणून याचिका दाखल

बाळासाहेबांची प्रकृती खालावलेली असताना त्यांची दिशाभूल करत त्यांच्याकडून मृत्यूपत्र तयार करून घेतल्याचा जयदेव यांचा आरोप होता. त्यामुळेच बाळासाहेब यांच्या मृत्यूनंतर उद्धव यांनी बाळासाहेबांचं मृत्यूपत्र न्यायालयात प्रमाणित करण्यासाठी अर्ज केला असता त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतला. त्यांनतर वाद आणखी उफाळला नि जयदेव यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी सुरू होती. 


शुक्रवारी याचिका मागे

पण शुक्रवारी मात्र जयदेव यांनी ही याचिका मागे घेतली आहे. आपल्याला हा खटला अजून पुढं न्यायचा नाही, असं म्हणत त्यांनी ही याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे आता बाळासाहेबाच्या संपत्तीवरून सुरू झालेला वाद अखेर मिटला आहे. तर बाळासाहेबांच्या संपत्तीची मालकी उद्धव यांच्याकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


हेही वाचा - 

तर, राम मंदिर उभारण्यासाठी १ हजार वर्षे लागतील- संजय राऊत



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा