Advertisement

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी स्मारकाचं भूमिपूजन?

उद्धव २५ नोव्हेंबर रोजी राम मंदिराच्या मुद्द्यावर अयोध्येचा दौरा करणार आहे. या दौऱ्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाला महापालिकेकडून अधिकृतरित्या सुरूवात व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी स्मारकाचं भूमिपूजन?
SHARES

येत्या १७ नोव्हेंबर रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या सहावा स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनानिमित्ताने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्याची तयारी शिवसेनेने सुरू केल्याची माहिती मिळत आहे.


आयुक्तांची भेट

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता आणि महापालिका अधिकाऱ्यांची दादरच्या शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात भेट घेतली. या भेटीत महापौर बंगल्यात साकारण्यात येणाऱ्या बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजन करण्याबाबत चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजत आहे.


अयोध्येचा दौरा

उद्धव २५ नोव्हेंबर रोजी राम मंदिराच्या मुद्द्यावर अयोध्येचा दौरा करणार आहे. या दौऱ्यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाला महापालिकेकडून अधिकृतरित्या सुरूवात व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.


विरोधकांकडून टीका

स्मारकाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्धव यांच्यावर जहरी टीका करण्यात आली होती. मागच्या ५ वर्षांत जे आपल्या वडिलांचं स्मारक बांधू शकले नाही, ते राम मंदिर काय बांधणार? अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला होता. यावरून बराच वाद रंगला होता.



हेही वाचा-

बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणून उद्धव आहेत, अजित पवारांचा पलटवार

उद्धव यांच्या अयोध्या वारीसाठी मनसेच्या शुभेच्छा! पण...

तुम्ही राममंदिर बांधता की आम्ही बांधू?, उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला आयोध्येत



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा