Advertisement

बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणून उद्धव आहेत, अजित पवारांचा पलटवार

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली म्हणून आज उद्धव ठाकरे दिसत आहेत. पित्याच्या कतृत्वावर उद्धव ठाकरे राजकारण करताहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी पलटवार केला आहे.

बाळासाहेबांनी पक्ष स्थापन केला म्हणून उद्धव आहेत, अजित पवारांचा पलटवार
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. अजित पवारांना राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकाच्या पुण्याईमुळे अजित पवार असून मुतऱ्या थोबाडाने अजित पवार काहीतरी बोलत असतात, अशी जहरी टीका सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांवर करण्यात आली आहे. त्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली म्हणून आज उद्धव ठाकरे दिसत आहेत. पित्याच्या कतृत्वावर उद्धव ठाकरे राजकारण करताहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी पलटवार केला आहे.


अग्रलेखातून टीका

५ वर्षांत बापाचं स्मारक बांधू शकले नाही ते राम मंदिर काय बांधणार? अशी टीका करणाऱ्या अजित पवारांवर शिवसेनेने सामना या मुखपत्रातून वार केला. अग्रलेखातून अजित पवारांवर अगदी जहरी आणि तिखट टीका करण्यात आली. या टीकेला अजित पवारांनी त्याच भाषेत उत्तर दिलं आहे.


याच भाषेची अपेक्षा?

काकाच्या पुण्याईवर मी राजकारण करत असेल तर उद्धव ठाकरे यांचं राजकारण हे पित्याच्या कतृत्वावरच असल्याचं उत्तर त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. बाप हा शब्द ग्रामीण भागात वडिलांसाठी आदरानंच वापरला जातो, तेव्हा माझा शब्दप्रयोग योग्यच होता. पण त्यांना सत्य बोचलं. बाळासाहेबांचं स्मारक ५ वर्षे का रेंगाळलं? हा प्रश्न बोचला, त्यांना मिरच्या झोंबल्या आणि हेच अग्रलेखातून त्यातील भाषेतून दिसून येत असल्याचं म्हणत अजित पवार यांनी शिवसेनेकडून आपण चांगल्या भाषेची अपेक्षाच करत नसल्याचंही म्हटलं.


दुटप्पी प्रवृत्ती

एकीकडे सत्तेत रहायचं आणि दुसरीकडे विरोध करायचा अशी दुटप्पी प्रवृत्ती असणारी शिवसेना असल्यानंच आपण त्याला गांडुळाची उपमा दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणत शिवसेनेच्या टीकेला आपण जास्त महत्त्व देत नसल्याचं म्हणत त्यांनी शिवसेनेला खिजवण्याचाही प्रयत्न केला आहे.



हेही वाचा- 

अजित पवार मुतऱ्या थोबाडाचे, शिवसेनेची सामनातून टीका

भित्रेपणा लपवण्यासाठी शिवसेना मोदींविरोधात फक्त अग्रलेख लिहिते- ओवेसी




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा