Advertisement

अजित पवार मुतऱ्या थोबाडाचे, शिवसेनेची सामनातून टीका

अजित पवार यांना राजकारणत काडीमात्र किंमत नसून ते काकांच्या पुण्याईवरच तरले आहेत. आणि हे अजित पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि दुष्काळाकर मुतऱ्या थोबाडाने बोलत असतात अशी जहरी टीका सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर करण्यात आली आहे.

अजित पवार मुतऱ्या थोबाडाचे, शिवसेनेची सामनातून टीका
SHARES

गेल्या ५ वर्षांत बापाचं स्मारक बांधू शकले नाहीत, ते राम मंदिर काय बांधणार? असा खोचक सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खिल्ली एका कार्यक्रमांदरम्यान उडवली होती. अजित पवारांच्या या खोचक सवालाला शिवसेनेने अखेर खास ठाकरी शैलीत सामनातून उत्तर दिलं आहे. अजित पवार यांना राजकारणत काडीमात्र किंमत नसून ते काकांच्या पुण्याईवरच तरले आहेत. आणि हे अजित पवार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणि दुष्काळाकर मुतऱ्या थोबाडाने बोलत असतात अशी जहरी टीका सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर करण्यात आली आहे.


गटारी किडा

राम मंदिरासंबधीच वक्तव्य करत अजित पवार यांनी रामासह बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला आहे. अजित पवार हा पुण्यातील राजकारणतील एक गटारी किडा आहे. गटारातील घाण पाण्यावर तो जगतो. भ्रष्टाचार हाच त्याचा प्राणवायू आहे. हे गटार ही त्याचे स्वतः चे असून ते त्याच्याच पक्षाने तयार केलं आहे. त्यामुळे या गटारातल्या किड्याला किंमत देण्यास जनता तयार नाही. त्यामुळे हा किडा मधेमधे वळवळतो, बडबडतो असं म्हणत सामनातून अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं आहे.


राष्ट्रवादीवरही तोंडसुख

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीवरही सामनातून तोंडसुख घेण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आजही शरद पवार यांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवार यांची रिकामी खोपडी आहे. आम्ही त्या खोपडीस किंमत देत नाही. राम मंदिराला विरोध करणे हेच त्यांचं धोरण असल्याचं म्हणत अजित पवार यांच्यावर सामनामधून तिखट टीका करण्यात आली आहे. शेवटी 'अशा नरा मोजूनी माराव्या पैजारा हजार माराव्यात आणि एक मोजावी' असं जे संतानी सांगितलं आहे. त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रतील जनता करेल असं स्पष्ट केलं आहे.


टीका करताना भान राखावं- काँग्रेस

अजित पवार यांच्यावर टीका करताना सामनामध्ये ज्या भाषेचा शब्दांचा वापर केला आहे त्यावरच आता टीका होऊ लागली आहे. राजकारणत नेहमीच एकमेकांवर टीका होते. टीका करण्याचा अधिकार सर्वाच आहे, पण ही टीका करताना प्रत्येकन भान राखलं पाहिजे. भाषा आणि शब्द जपून वापरले पाहिजे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.



हेही वाचा-

एकत्रच लढवणार निवडणुका, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला पुन्हा गोंजारलं

भित्रेपणा लपवण्यासाठी शिवसेना मोदींविरोधात फक्त अग्रलेख लिहिते- ओवेसी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा