Advertisement

उद्धव यांच्या अयोध्या वारीसाठी मनसेच्या शुभेच्छा! पण...


उद्धव यांच्या अयोध्या वारीसाठी मनसेच्या शुभेच्छा! पण...
SHARES

''अयोध्या वारीसाठी शुभेच्छा, पण राज्यातील गंभीर प्रश्नांचं काय?'' अशा प्रकारचा प्रश्न विचारत मनसेकडून पुन्हा एकदा शिवसेनेविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. दादरमधील शिवसेना भवन परिसरात मनसेने ही पोस्टरबाजी केलेली पाहायला मिळत आहे. या पोस्टरमधून मनसेने सत्तेत बसलेल्या शिवसेनेला थेट सवाल केला आहे.


भाषणातून मिळाला मुद्दा

महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त होणार का?, महागाई कमी होणार का? महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? बेरोजगारांना रोजगार मिळणार का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित करत मनसेने दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून पोस्टरबाजी केली आहे.


उद्धव यांची घोषणा

शिवाजी पार्कमध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाऊन राम मंदिराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारणार आहे, अशी घोषणा केली होती. त्यावर मनसेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.


मनसेने शिवसेनेला विचारलेले प्रश्न 'असे'

  • महाराष्ट्राचे रस्ते खड्डे मुक्त होणार का?
  • महागाई कमी होणार का?
  • महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का?
  • बेरोजगारांना रोजगार मिळणार का?
  • शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का?
  • शेती मालाला हमी भाव मिळणार का? महाराष्ट्रातला दुष्काळ संपणार का?
  • मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का?
  • महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का?
  • खिशातले राजीनामे बाहेर पडणार का?



हेही वाचा- 

तुम्ही राममंदिर बांधता की आम्ही बांधू?, उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला आयोध्येत

#MeToo: नाना 'तसे' नाहीत, राज यांनी केली पाठराखण!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा