COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,87,521
Recovered:
57,42,258
Deaths:
1,18,795
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,453
570
Maharashtra
1,23,340
8,470

आठवड्याला ‘ती’ बाई ३० लाखांचे ड्रग्ज विकायची

तिच्या घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी पोलिसांना तिच्या घरात दीड लाखांची रोकड आणि एक डायरी सापडली. या डायरीत ड्रग्ज व्यवहारांबाबत सर्व माहिती शबिना लिहित होती.

आठवड्याला ‘ती’ बाई ३० लाखांचे ड्रग्ज विकायची
SHARES

केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाईंचा धडाका लावला असतानाच, मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या कुर्लातील शबिना सर्फराज खान (२६) हिला अटक केली. पोलिसांना हिच्याजवळ एक डायरी सापडली. या ५० पानी डायरीची पोलिसांनी झाडाझडती घेतली असता. त्याच्यातील व्यवहार पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. शबिना आठवड्याला कमीत ३०लाखांचा ड्रग्ज पुरवठा करत असल्याचे त्यातून सिद्ध झाल्याचे कळते.

हेही वाचाः- कोरोनाची लस सर्वातआधी कोणाला मिळणार? आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

कुर्ला परिसरात राहणाऱ्या शबिना खान हि सध्या मुंबईतील मोठ्या ड्रग्ज डिलरपैकी एक आहे. तिच्याकडे बहुतांश लोक हे एमडी ड्रग्जसाठी यायचे. तिचा नवरा सर्फराज खान याच्यावरही बहुतांश गुन्हे असल्यामुळे पोलिसांनी त्याला तडीपार केले आहे. तर बाकी सर्व कुटुंब हाच व्यवसाय करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. रविवारी शबिना ही ५०३ ग्रॅम एमडी ड्रग्ज, ज्याची बाजारात किंमत ५० लाख इतकी आहे . हे एमडी ड्रग्ज घेऊन शबिना कब्रस्तान गेट समोर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरळी पोलिसांनी तिला रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी तिच्या घराची झाडाझडती घेतली. त्यावेळी पोलिसांना तिच्या घरात दीड लाखांची रोकड आणि एक डायरी सापडली.

हेही वाचाः- आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो

या डायरीत ड्रग्ज व्यवहारांबाबत सर्व माहिती शबिना लिहित होती.  पोलिसांनी तपासा दरम्यान शबिनाच्या डायरीचा अभ्यास केला असता.  ती  आठवड्याला तब्बल अंदाजे ३० लाखांचं ड्रग्ज संपूर्ण मुंबईत विकत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस आता शबिनाकडून ड्रग्ज घेणारे आणि विकणाऱ्यांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे तिच्या या व्यवसायात संपूर्ण कुटुंब गुंतलेलं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. हे अंमली पदार्थ ती कोठून आणत होती, त्याच बरोबर तिच्या संपर्कातील इतर तस्करांचा आता पोलिस शोध घेत आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा