चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी आधी ट्रस्टी नंतर शिक्षिकेला अटक


चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी आधी ट्रस्टी नंतर शिक्षिकेला अटक
SHARES

3 वर्षाच्या चिमुरडीवर शाळेच्या ट्रस्टीकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी अखेर पोलिसांनी मंगळवारी शिक्षिकेला अटक केली आहे. 18 मे रोजी पीडित 3 वर्षाच्या मुलीच्या आईने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात केली होती. नोव्हेंबर 2016 ते मार्च 2017 दरम्यान अटक करण्यात आलेल्या वर्गशिक्षिकेने 3 वर्षाच्या पीडित मुलीला दुसऱ्या एका विद्यार्थ्यासह ट्रस्टीच्या केबिनमध्ये सोडले होते. जिथे तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचे तिच्या आईने आपल्या जबाबात म्हटले होते. यावेळी आपल्या मुलीसोबतच आणखी एका मुलावर देखील दुष्कृत्य झाल्याचा दावा मुलीच्या आईने केला होता.


आरोपी ट्रस्टीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

ज्यावेळी आरोपी ट्रस्टी पॅट्रिक ब्रिलियंटवर गुन्हा दाखल झाला त्यावेळी तो परदेशात होते. भारतात परतल्यानंतर त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज फेटाळल्यानंतर ७ नोव्हेंबरला आरोपी ट्रस्टी पॅट्रिकला अटक करण्यात आली. सध्या पॅट्रिक ब्रिलियंट हा न्यायालयीन कोठडीत आहे.


पीडित मुलीच्या आईने कोर्टात घेतली धाव

त्या 3 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकणी 18 मे रोजी आरोपी ट्रस्टीविरोधात पॅाक्सो कायद्यांर्तगत गुन्हा दाखल झाला होता. कित्येक महिन्यांनंतरही याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी कोणालाच अटक न केल्याने पीडित मुलीच्या आईने कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती.


अखेर न्याय मिळाला

त्या याचिकेची दखल घेत कोर्टाने एमआयडीसी पोलिसांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर सुरुवातीला ट्रस्टी आणि आता शिक्षिकेला अटक करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात या प्रकरणचा अहवाल एमआयडीसी पोलिसांना कोर्टात सादर करायचा आहे.हेही वाचा - 

शाळेतील विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 'त्या' ट्रस्टीला अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा