नैराश्येचं ग्रहण, टाटा रुग्णालयातील भूलतज्ज्ञांची आत्महत्या


नैराश्येचं ग्रहण, टाटा रुग्णालयातील भूलतज्ज्ञांची आत्महत्या
SHARES

नैराश्याच्या आहारी जाणं हे नेहमीच धोकादायक असतं. कोणी नोकरीच्या टेन्शनने निराश होतं, तर कोणी परीक्षेत नापास झाल्यावर निराश होतं. याचचं एक उदाहरण म्हणजे पोलिस अधिकारी हिमांशू रॉय यांनी आजारपणाला कंटाळून केलेली आत्महत्या. या गोष्टीला महिनादेखील सरत नाही तोवर परळमधील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये २ जून रोजी रात्री ११. ३० च्या सुमारास एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


नेमकं काय झालं?

डॉ. रुपाली कळकुंदरे असं या डाॅक्टरचं नाव आहे. या डाॅक्टरने नैराश्यामुळे आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. डॉ. रुपाली या टाटा मेमोरियल सेंटरमध्ये निवासी डॉक्टर असून त्या भूलतज्ञ म्हणून कार्यरत होत्या. रात्री आत्महत्येच्या प्रयत्नानंतर त्या जमिनीवर कोसळल्या. या घटनेची माहिती मिळताच उपस्थित डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली; पण उपचारादरम्यान डॉ. रुपाली यांचा दुर्दैवी अंत झाला.

रुपाली यांचं शव त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आलं असून पोस्टमार्टमचे रिपोर्ट अजून आलेले नाहीत. या घटनेची नोंद भोईवाडा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.



हेही वाचा-

हिमांशू रॉय यांचा कॅन्सर नियंत्रणात होता, मग नक्की झालं काय?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा