Coronavirus pandemic : कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी

राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या ही १०२५ इतकी आहे. त्यात ९१० कर्मचारी आणि ११५ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Coronavirus pandemic : कोरोनाने घेतला आणखी एका पोलिसाचा बळी
SHARES

महाराष्ट्रात कोरोना महामारीने दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली असताना. अत्यावश्यक सेवेतील पोलिसांना या संपूर्ण परिस्थितीचा मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे राज्यातीलतब्बल ६३ पोलिसांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. त्याच मुंबई पोलिस दलातील पोलिसांची संख्या ही सर्वाधिक म्हणजेच ३९ इतकी आहे. दरम्यान गुरूवारी पायधुनी पोलिस ठाण्यातील एका पोलिसाचा मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. मुंबई पोलिस दलातील कोरोना बाधीत पोलिसांवरील उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले आहे.

हेही वाचाः- परीक्षा रद्द; तरिही मुंबई विद्यापीठाकडून शुल्क आकारणी

पायधुनी पोलिस ठाण्यात कार्यरत ५७ वर्षीय पोलिस हवालदाराचा गुरूवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. ते दक्षिण मुंबईतील रहिवासी होते. तीन महिन्यात ते निवृत्त होणार होते. पण त्यापूर्वीच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी उपचारासाठी त्यांना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ५५ वर्षांवरील पोलिसांना कोरोना काळात सुटी दिल्यामुळे ते सध्या घरीच होते. त्यांच्या पश्चात मुलगा व मुलगी असा परिवार आहे. राज्यातील  ६३ पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या  ही १०२५ इतकी आहे. त्यात ९१० कर्मचारी आणि ११५ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने मुंबईतील ३७ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३८, पुणे ३, सोलापूर शहर ३, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे ३ पोलीस व ठाणे ग्रामीण १अधिकारी २, जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना  पोलीस अधिकारी १, उस्मानाबाद १ अशा ६३ पोलिस बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. राज्यात

कोरोनाबाधीत पोलिसांसाठी डॉक्टरांचे विशेष पथक

कोरोना बाधीत पोलिसांचे स्वास्थ व त्यांच्या देण्यात आलेले उपचार यावर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष पथक नियुक्त केले आहे.  त्यांच्या मार्फत प्रकृती गंभीर असलेल्या पोलिसांवर सुरू असलेल्या उपचारांवर लक्ष ठेवले जात आहे. याशिवाय लक्षण अलेल्या पोलिसांच्या स्थितीबाबतही पाहणी केली जात आहे. हे पथक नागपाडा येथील पोलिस रुग्णालयात सध्या बसत आहे. याशिवाय मुंबईतील चार कोविड केअर सेंटर वपोलिस हेल्पलाईनकडेही यापथकामार्फत लक्ष ठेवले जात आहे.

हेही वाचाः- टॉमेटोचे भाव गगनाला भिडले, किंमत ऐकून बसेल धक्का

संबंधित विषय