Advertisement

टॉमेटोचे भाव गगनाला भिडले, किंमत ऐकून बसेल धक्का

लॉकडाउनचा काळ जसा वाढत आहे त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर होत आहे. भाज्यांचे दर वेगानं वाढत आहेत.

टॉमेटोचे भाव गगनाला भिडले, किंमत ऐकून बसेल धक्का
SHARES

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा कहर सुरू आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढवला आहे. लॉकडाउनचा काळ जसा वाढत आहे त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर होत आहे. भाज्यांचे दर वेगानं वाढत आहेत. विशेषतः किरकोळ बाजारात दर जास्त वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

दोन दिवसांपूर्वी भांडुप, घाटकोपर, वांद्रे, खार, अंधेरी, ब्रीच कँडी आणि नवी मुंबईच्या किरकोळ बाजारात टोमॅटरची किंमत ५० रुपये किलो होती. आता बाजारात टोमॅटो ७०-८० रुपये प्रति किलो दरानं विकला जात आहे. टॉमेटोच्या वाढलेल्या दरासाठी भाजीपाला विक्रेते लॉकडाऊन कारणीभूत असल्याचं म्हणत आहेत.

लॉकडाऊनमुळे शेतीसाठी मजूर मिळणं अवघड झालं आहे. असं किरकोळ विक्रेत्यांचं म्हणणं आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. यामुळे नवीन शेती देखील झाली नाही.

वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये होलसेल टोमॅटोची किंमत ४५-४७ झाली आहे. ज्यामुळे किरकोळ बाजारात किंमत ७०-८० रुपये आहे.

कारलं, शिमला मिर्ची, आले आणि हिरवे वाटाणे यांचे दर किरकोळ बाजारात १०० रुपयांच्या घरात गेले आहेत. भाजीपाल्यांचे दर वाढल्यानं सामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे.

अंधेरी इथं राहणारे गिरीजेश त्रिपाठी म्हणतात की, लॉकडाऊनमुळे लोक तशीच त्रस्त झाली आहेत. बऱ्याच लोकांच्या नोकर्‍या जात आहेत. कंपन्या बंद पडत आहेत. अशा परिस्थितीत भाजीपाल्याच्या किंमती वाढल्यामुळे लोकांना त्रास होणार आहे.हेही वाचा

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक भागांमध्ये साचलं पाणी

Shiv Bhojan Thali: मुंबई-ठाण्यात जूनमध्ये ३.२९ लाख शिवभोजन थाळ्यांचं वाटप

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा