कोट्यवधींच्या हेरॉईन तस्करीप्रकरणी परदेशी महिलेला अटक


कोट्यवधींच्या हेरॉईन तस्करीप्रकरणी परदेशी महिलेला अटक
SHARES

कोट्यवधी रुपयांच्या हेरॉईन तस्करीसाठी मुंबईत आलेल्या परदेशी महिलेला अंमली पदार्थविरोध पथकाने बोरिवलीतून अटक केली आहे. या महिलेकडून पोलिसांनी दीड कोटी किमतीची सुमारे दीड किलो हेरॉईन जप्त केली. ही महिला दिल्लीहून येणाऱ्या ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेसने मुंबईत आली होती.


महिला युगांडा देशाची नागरिक

ग्रेस बिरुंगी नाकीटेंडे असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. ती युगांडातील बम्बारा येथील रहिवासी आहे. तिच्याकडून दीड कोटी रुपयांची 1.33 किलो हेरॉईन जप्त करण्यात आली आहे. दिल्लीवरून येणाऱ्या ऑगस्ट क्रांती 


दिल्लीहून येत होती मुंबईला

मुंबईला येत असलेल्या या महिलेकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी एक्स्प्रेस बोरिवलीला आल्यानंतर महिलेला ताब्यात घेण्यात आलं. त्यावेळी तिच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात पांढऱ्या रंगाचा संशयीत पदार्थ आढळून आला. त्याचं परिक्षण केलं असता ते हेरॉईन असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्या महिलेला अटक केली. ती मोठ्या रॅकेटचा भाग असल्याचा संशय असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं.

दरम्यान, चौकशीत दिल्लीतून खरेदी केलेलं हेरॉईन ती मुंबईत कोणाला तरी देणार होती. ती काही दिवस दिल्लीत वास्तव्याला होती. सध्या यासंदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचं काम अमली पदार्थ विरोधी (एनसीबी) पथक करत असून तिच्या साथीदारांचा शोध घेत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा