१२ कोटींचं हेरॉइन जप्त, दोघांना अटक

दोघे आरोपी अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती शनिवारी अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळाली होती. त्यानुसार, अंमली पदार्थविरोधी पथकाने मालाड रेल्वे स्थानकाबाहेर सापळा रचला.

१२ कोटींचं हेरॉइन जप्त, दोघांना अटक
SHARES

अंमली पदार्थविरोधी पथकाने ६ किलो हेरॉइन ड्रग्ज जप्त करून दोघांना अटक केली आहे. या हेरॉइनची किंमत तब्बल १२ कोटी रुपये आहे. अटक करण्यात आलेले दोघे हेरॉइनचे पुरवठादार आहेत. राजस्थानमधून हे हेरॉइन मुंबईत आणण्यात आलं होतं. 

राजेश तुलसीदास जोशी (५०, मालाड) आणि कृष्णमूर्ती मुत्तीसवई कवांदर (४२, गोराई) अशी आरोपींची नावं आहेत. दोघे आरोपी अंमली पदार्थाच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती शनिवारी अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांना मिळाली होती. त्यानुसार, अंमली पदार्थविरोधी पथकाने मालाड रेल्वे स्थानकाबाहेर सापळा रचला. यावेळी दोघांना अटक केली. राजेश जोशीकडून ४ किलो तर कृष्णमूर्ती कवांदरकडून २ किलो हेरॉइन जप्त केले. 

राजस्थानमधून आणलेले हे हेरॉइन मुंबईत आणताच १० मिनिटांत संबंधित ठिकाणी पोहोचविण्याची जबाबदारी जोशीवर होती. ठरलेल्या ठिकाणी ड्रग्ज पोहोचल्यानंतर तेथे त्यामध्ये भेसळ केली जात होती. त्यानंतर हे ड्रग्ज मानखुर्द ते बोरीवलीतील विविध भागांत तस्कर, ग्राहक, वितरकांच्या साखळीद्वारे पोहोचविण्यात येत असे. जोशी आणि कवांदर हे दोघेही पडद्यामागून काम करत होते. त्यांच्या मुख्य सूत्रधाराचा शोध पोलीस घेत आहेत. दोघांनाही ९ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.



हेही वाचा -

मद्यधुंद अवस्थेत पोलिसाने हरवल्या बंदुकीतल्या ३० गोळ्या

'त्या' महिलेचे शिर सांताक्रूझ-चेंबूर, लिंकवर रोड सापडलं?




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा