शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवणाऱ्यांवर कारवाई

खोटी बिलं देऊन शासनाची कोट्यवधी रूपयांच्या महसूलाची हानी करणाऱ्या करदात्यांविरूद्ध महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवणाऱ्यांवर कारवाई
SHARES

खोटी बिलं देऊन शासनाची कोट्यवधी रूपयांच्या महसूलाची हानी करणाऱ्या करदात्यांविरूद्ध महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मे.लॅव्हिश एन्टरप्राइजेस आणि मे.आर्यन इंटरनॅशनलचं प्रकरण पुढील तपासासाठी राज्य कर सहआयुक्त अन्वेषण-अ यांच्या कार्यालयात पाठविण्यात आलं होते. सदर प्रकरणात २२  डिसेंबर २०२० रोजी अन्वेषण भेट देण्यात आली होती. तपासणीदरम्यान असं लक्षात आलं की, करदाता मे.लॅव्हिश एन्टरप्राईजेसचे मालक प्रकाश कुमार वीरवाल आणि मे.आर्यन इंटरनॅशनलचे मालक प्रभुलाल तेली व्यवसायाच्या ठिकाणी उपलब्ध नाहीत आणि सदर जागेवर ते कोणताही व्यवसाय करीत नाहीत. तसंच एक वर्षापासून सदर कार्यालय बंद असल्याचं आढळून आलं.

हेही वाचा- “कल करे सो आज कर”, कार्यालयीन वेळेबाबत पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरेंची ‘ही’ मागणी

दोन्ही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७ च्या तरतूदीचं उल्लंघन करून वस्तुंच्या पुरवठ्याशिवाय रूपये ४२८ कोटी रूपयांची बनावट बिलं देऊन आणि रू.७९ कोटी रूपयांची बनावट वजावट मिळवून दिली आहे. म्हणूनच दोन्ही करदात्यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम-२०१७ च्या तरतूदीचं उल्लंघन करून वस्तूंचा पुरवठा न करता बीजक किंवा बिल जारी करून शासनाची महसूल हानी केली आहे. सूरजसिंग (उर्फ विराट सिंग) यांना महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने  १८ फेब्रुवारी २०२१ रोजी अटक केली असून न्यायालयाने सूरजसिंग (उर्फ विराट सिंग) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सूरजसिंग यांनी अशाच अनेक बनावट कंपन्या नोंदणी केल्याचा संशय असून शासनाच्या कोट्यवधी रूपयांची महसूल हानी केल्याचा संशय महाराष्ट्र वस्तू व कर विभागाने व्यक्त केला आहे. याबाबत सहायक आयुक्त नंदकुमार दिघे यांच्या नेतृत्वाखालील आणि उपआयुक्त गजानन खानंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. या तपासासाठी अन्वेषण-अ चे सहआयुक्त ई.रविंन्द्रन यांचं मार्गदर्शन लाभलं आहे, असं प्रसिद्धीपत्रक महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाकडून प्रसिद्धीस देण्यात आलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा