आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: आरोपपत्र दाखल करण्यासाठी NCBला ६० दिवसांची मुदतवाढ

तपास यंत्रणेने २ ऑक्टोबर २०२१ रोजी गुन्हा नोंदवला होता आणि २० लोकांना अटक केली होती.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण: आरोपपत्र दाखल करण्यासाठी NCBला ६० दिवसांची मुदतवाढ
SHARES

बॉलिवूडमधील चर्चित आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबई कोर्टानं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)ला आरोपपत्र दाखल करण्यासाठी ६० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी तपास यंत्रणेला २ एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल करायचे होते.

यापूर्वी सोमवारी (28 मार्च) एनसीबीनं आर्यन खानशी संबंधित क्रूझ प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी अतिरिक्त ९० दिवसांची मागणी करणारा अर्ज मुंबईतील सत्र न्यायालयात दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आपला निकाल राखून ठेवला होता.

या हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून एजन्सीचा तपास पूर्ण झालेला नाही, त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, असा युक्तिवाद एनसीबीनं न्यायालयात केला होता, जो आज न्यायालयानं मान्य केला आहे.

तपास यंत्रणेने २ ऑक्टोबर २०२१ रोजी गुन्हा नोंदवला होता आणि २० लोकांना अटक केली होती. यातील १८ आरोपी जामिनावर बाहेर आहेत. २ आरोपी अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत. एनसीबीकडे या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी १८० दिवसांचा कालावधी होता, जो २ एप्रिल २०२२ रोजी संपतो.

कॉर्डेलिया क्रूझ २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय पोर्ट टर्मिनलवरून गोव्यासाठी रवाना झाली. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतलं होतं. २८ ऑक्टोबर २०२१ रोजी आर्यन खानला जामीन मिळाला होता.

एनसीबीने आर्यन व्यतिरिक्त मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इस्मीत सिंग, मोहक जस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा आणि अरबाज मर्चंट यांना ताब्यात घेतले होते.

आतापर्यंतच्या तपासात समोर आले की, काही प्रवाशांनी सुरक्षा तपासणी चुकवण्यासाठी आणि क्रूझवर ड्रग्ज नेण्यासाठी त्यांच्या कपड्यांमध्ये खास खिसे बनवले होते. ताब्यात घेतलेल्या एका मुलीनं तिच्या बुटात ड्रग्ज लपवले होते.



हेही वाचा

कारच्या धडकेत बाईकस्वाराचा मृत्यू, 'जे जे'मधील निवासी डॉक्टरला अटक

क्रुरतेचा कळस! बोरिवलीमध्ये १० कुत्र्यांना भिंतीत गाडलं

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा