संजय दत्त ते आर्यन खान ‘या’ कलाकारांची बाजू मांडणारा वकील आहे तरी कोण?

रिया चक्रवर्तीपासून ते सलमान खानपर्यंत सर्व सेलिब्रिटिंची बाजू मांडणारे वकिल सतिश मानेशिंदे कोण आहेत? जाणून घ्या…

संजय दत्त ते आर्यन खान ‘या’ कलाकारांची बाजू मांडणारा वकील आहे तरी कोण?
SHARES

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर त्याची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील सतिश मानेशिंदे यांना नियुक्त करण्यात आलं आहे. त्यांनी या आधीही बॉलिवूडमधल्या ड्रग्सप्रकरणात सापडलेल्या अनेकांची बाजू मांडली आहे. कोण आहेत हे सतिश मानेशिंदे ? जाणून घ्या…


सेलिब्रिटी वकिल

सतिश मानेशिंदे हे हाय प्रोफाईल प्रकरणांसाठी काही नवे नाहीत. त्यांनी याआधीही बॉलिवूडमधल्या अनेक स्टार्सची बाजू मांडली आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांची बाजूही मानेशिंदे यांनीच मांडली होती. सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर या दोघांनाही ड्रग्स प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं अटक केली होती. या दोघांनाही नंतर जामीन मंजूर करण्यात आला.

१९९३ च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तची बाजू मांडणाऱ्या वकिलांच्या गटात सतिश मानेशिंदेही होते. अतिगंभीर आरोप असूनही त्यावेळी मानेशिंदे यांनी संजय दत्तला जामीन मिळवून दिला होता. त्यानंतर मानेशिंदे हे सर्व हाय प्रोफाईल प्रकरणांसाठी देशातले सर्वात प्रसिद्ध वकिलांपैकी एक ठरले.

२००२ मध्ये सलमान खानवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांप्रकरणीही त्याची बाजू मांडत मानेशिंदे यांनी त्याला जामीन मिळवून दिला होता.


जेठमलानींसोबत करिअरला सुरुवात

दिवंगत वकील राम जेठमलानी यांच्या नेतृत्वाखाली सतीश मानशिंदे यांनी १९८३ मध्ये आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्यासोबत जवळपास दहा वर्षे काम केले.

जेठमलानी यांच्या प्रशिक्षणार्थी म्हणून काम केल्याच्या १० वर्षांच्या काळात मनेशिंदे यांनी दिवाणी आणि फौजदारी कायद्याचा सराव केला आणि राजकारणी, अभिनेते आणि इतर सेलिब्रिटींची प्रकरणं हाताळली.


महागड्या वकीलांपैकी एक

मुंबईतील एक अग्रगण्य वकील आणि एक विश्वासार्ह सेलिब्रिटी वकील असल्यानं, मानशींदे केस लढण्यासाठी आपल्या क्लायंटकडून भरमसाठ फी आकारतात. बॉलिवूड लाइफमधील एका रिपोर्टनुसार, मानशींदे केस लढण्यासाठी दिवसाला १० लाख रुपये घेतात.



हेही वाचा

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक

आर्यन शाहरुख खानविषयी जाणून घ्या सर्व काही

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा