शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक, लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेले?

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक, लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेले?
SHARES

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासोबतच आणखी ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या समुद्रात एका क्रूझवर ( CRUISE SHIP) सुरू असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीचा एनसीबीनं पर्दाफाश केला. या छाप्या दरम्यान आर्यन खान त्यांना सापडला.

आर्यननं लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची चर्चा देखील होत आहे. यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही 

एनसीबी अधिकारी आर्यनला मुंबईच्या जे जे रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन गेले आहेत. तिथे त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.  वैद्यकीय चाचणीनंतर आर्यनला मुंबईत कोर्टात हजर केलं जाणार आहे. एनसीबीनं आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांना अटक केली आहे.

एनसीबीनं आर्यनसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी चौघांची चौकशी झाली असून त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. इतर चार जणांची एनसीबीकडून कसून चौकशी सुरू आहे.

NCB नं प्रवासी म्हणून मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लक्झरी क्रूझ Cordelia मध्ये जॉईंट सीक्रेट ऑपरेशन केलं. सुमारे ७ तास चाललेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीनं (NCB) मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केली आहेत. 

छाप्या दरम्यान एनसीबीनं एकूण ८ जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. तर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही ताब्यात घेतल्याचं सकाळी समोर आलं. मात्र आपल्याला गेस्ट म्हणून बोलावलं असल्याचं आर्यन खाननं सांगितल्याची माहिती मिळत आहे.

आर्यन खाननं चौकशीत सांगितलं की, त्याला या क्रुझवर गेस्ट म्हणून बोलावण्यात आलं होतं आणि त्याच्याकडून कुठल्याही प्रकारचं मानधन देण्यात आलेलं नव्हतं. केवळ आपल्या नावाचा वापर करुन इतरांना बोलावण्यात आलं होतं.

या कारवाईनंतर NCB नं अधिकृत माहिती (Official Statement of NCB) दिली आहे. एनसीबीनं दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, NCB मुंबईच्या अधिकाऱ्यांनी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर छापा टाकला.

या ऑपरेशन दरम्यान MDMA/ एक्स्टसी, कोकेन, एमडी (Mephedrone) आणि चरस सारख्या विविध ड्रग्स जप्त करण्यात आले. यात एकूण ८ जणांना ताब्यात घेतलं असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. सध्या ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी एनसीबी मुंबईनं गुन्हा ९४/२१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी एनसीबीनं क्रूझ पार्टीची आयोजन केलेल्या सहा आयोजकांनाही बोलावलं आहे. एनसीबीनं आर्यन खानचा फोन जप्त केला असून अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जात आहे. एनसीबी जप्त केलेल्या फोनवरून चॅट्सचा तपास करत आहे.



हेही वाचा

आर्यन शाहरुख खानविषयी जाणून घ्या सर्व काही

MindYourLanguage : मुंबई पोलिसांचं ट्विट व्हायरल, म्हणाले, ” हे चित्रपटातही शोभत नाही”

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा