'त्या' गर्दीत मोबाईलवर डल्ला, चोरांनी हात केले साफ

चोरांनी चांगलेच हात साफ केले आहेत. तब्बल १२ जणांचे मोबाईल लंपास केले आहेत.

'त्या' गर्दीत मोबाईलवर डल्ला, चोरांनी हात केले साफ
SHARES

मुंबई ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यनला एनसीबीने अटक केली. त्याला जामीन मिळाला. त्यानंतर शाहरुखच्या मन्नत बंगल्याबाहेर आणि आर्थर रोड कारागृहाबाहेरील गर्दीत मोबाईल चोरांची चांगलीच चांदी झाली आहे. चोरांनी चांगलेच हात साफ केले आहेत. तब्बल १२ जणांचे मोबाईल लंपास केले आहेत. दरम्यान, मन्नत बाहेरील मोबाईल चोरांना अटक करण्यात आली आहे.

२६ दिवसानंतर अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची जेलमधून सुटका झाली. आर्यनला पाहण्यासाठी जेलबाहेर, मन्नतबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी केली होती. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी मोबाईल लंपास केलेत. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांना चांगलाच फटका बसला.

आर्यन खान याला नेण्यासाठी शाहरूख खानही वरळीतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबला होता. आर्थर रोड जेल आणि मन्नत बंगला या दोन्ही ठिकाणी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. चाहत्यांनी ढोलताशे वाजवून फटाके फोडून आर्यन खान याचे स्वागत केले.

आर्थर रोड कारागृहाबाहेर चोरांचा सुळसुळाट झाला दिसून आला. काल दिवसभरात १२ जणांचे गर्दीत मोबाईल चोरीला गेले. शाहरूख खान याच्या मुलाचा जामीन परवा मंजूर झाल्यावर आर्थर रोड कारागृह, मन्नत बंगल्याबाहेर मोठी गर्दी होती. शाहरूखचे चाहते, देशभरातला मीडिया, बघे, पोलीस बंदोबस्त अशी मोठी गर्दी होती. या गर्दीत चोरट्यांनी हात साफ केला. तर मन्नत बाहेर गर्दीत चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल चोरले, पण, काही चोर पोलिसांच्या तावडीत सापडलेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा