SHARE

हिंदू एकता मंच आणि शिवराज प्रतिष्ठानच भीमा-कोरेगाव दंगल घडवण्यामागे असल्याचा सनसनाटी आरोप होत असताना पिंपरी पोलिस ठाण्यात हिंदू एकता मंचाचे प्रमुख संभाजी भि़डे गुरूजी आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सर्व पक्षीय बैठक तरीही...

भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत दलित संघटना आणि मराठा संघटनांचे प्रतिनिधीही हजर होते. त्यावेळी दलित संघटनांनी ही दंगल घडवून आणण्यामागे मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरूजी यांचा हात असल्याचा आरोप केला. तर या दोघांना त्वरीत अटक व्हावी, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही उचलून धरली.कुठल्या आरोपांखाली?

त्यानुसार पिंपरीमध्ये या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. तर पिंपरी पाठोपाठ पुणे शहर पोलिस ठाण्यातही या दोघांविधोत दंगल घडवून आणणे आणि अॅट्राॅसिटी अशा आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्याची माहिती पुण्यातील रिप्ब्लिकन कामगार सेनेचे पदाधिकारी युवराज बनसोडे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

दरम्यान मुंबईसह राज्यभर भीमा-कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद उमटत असून मुंबईत तणावपूर्ण शांतता आहे. तर बुधवारी भारीप बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून पुण्यात येत्या तीन-चार दिवसांत पुण्यात मोठा निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान भिडे गुरूजी आणि एकबोटे यांना त्वरीत अटक करण्याची मागणी आता उचलून धरली जात आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या