सीमीच्या माजी सदस्याला अटक


सीमीच्या माजी सदस्याला अटक
SHARES

नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही तासच उरले असतानाच दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) स्टुडन्ट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया(सीमी) या प्रतिबंधीत संघटनेच्या माजी सदस्याला मुंबई विमानतळावरून शनिवारी ताब्यात घेतलं. या आरोपीविरोधात बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत(युएपीए) कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सर्जिल शेख असं त्याचं नाव आहे.


कसा आला ताब्यात?

नववर्षाच्या पूर्वसंध्येला दहशतवादी कारवाया होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन एटीएस संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेऊन आहे. याचदरम्यान सीमी या प्रतिबंधीत संघटनेशी संबंधीत आणि सध्या आखाती देशात वास्तव्याला असलेली व्यक्ती मुंबईला वारंवार भेट देत असल्याची माहिती एटीएसला मिळाली. त्यानुसार एटीएसने सापळा रचून शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर या आरोपीला ताब्यात घेतलं.


कुठल्या गुन्ह्यांतर्गत अटक?

सर्जिल शेख अशी त्याची ओळख पटली असून तो सीमी या प्रतिबंधित संघटनेचा माजी सदस्य आहे. त्याच्यावर कुर्ला पोलिसांनी युएपीए कायद्याच्या कलम १० व १३ सह भादंवि कलम १४३, १४४, १४५, १४७, १४९, ३५३ आणि मुंबई पोलिस कायदा कलम १३५ व ३७ अंतर्गत २००१ मध्ये आरोपपत्र दाखल केलं होतं. या कलमांतर्गत हा आरोपी फरार होता. या आरोपीला कुर्ला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असून मुंबईच्या भेटीबाबत एटीएस सर्व बाजूने तपास करत आहे.


काय आहे सीमी?

सिमी तथा स्टुडंट्‌स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया ही भारतातील एक दहशतवादी संघटना आहे. या संघटनेची सुरुवात एप्रिल १९७७ मध्ये उत्तर प्रदेशातील अलीगढ शहरात झाली. पण त्यातील काही सदस्य जहाल कारवायांमध्ये सहभागी झाले. बेकायदा कृत्यांमध्ये सहभागी झाल्यानंतर या संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. या संघटनेच्या जहाल गटाने पुढे इंडियन मुजाहिदीन ही दहशतवादी संघटना स्थापन केली.



हेही वाचा- 

चोर सोडून सन्याशालाच फाशी, ई-चलानचा भोंगळ कारभार!

लाचखोर पोलिसाला अटक


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा