चोर सोडून सन्याशालाच फाशी, ई-चलानचा भोंगळ कारभार!

दोन वाहनचालकांच्या गाड्यांचे नंबर एक... नियम तोडतो दुसरा... पण ई-चलान मात्र पहिल्याच व्यक्तीच्या नावे येत आहे. या प्रकारामुळे पनवेलमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला वाहतूक पोलिसांकडे वारंवार खेपा माराव्या लागत आहेत. तर कळव्यातील एका फोरव्हीलरच्या मालकाला पोलिसांकडून विदाऊट हेल्मेटचं ई-चलानचा लावण्यात आलं आहे.

चोर सोडून सन्याशालाच फाशी, ई-चलानचा भोंगळ कारभार!
SHARES

दोन वाहनचालकांच्या गाड्यांचे नंबर एक... नियम तोडतो दुसरा... पण ई-चलान मात्र पहिल्याच व्यक्तीच्या नावे येत आहे. या प्रकारामुळे पनवेलमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला वाहतूक पोलिसांकडे वारंवार खेपा माराव्या लागत आहेत. तर कळव्यातील एका फोरव्हीलरच्या मालकाला पोलिसांकडून विदाऊट हेल्मेटचं ई-चलानचा लावण्यात आलं आहे.


'तो' तोडतोय नियम, दंड मात्र 'याच्या' नावावर!

दादरच्या नायगाव परिसरात राहणाऱ्या सौरभ गुजर याने जानेवारी २०१७ मध्ये नवीन दुचाकी घेतली होती. मार्चमध्ये या दुचाकीचा रजिस्टर नंबर म्हणून त्याला ‘MH 01 CN 2238’ हा नंबर मिळाला. एका महिन्यानंतर एका ओळखीच्या व्यक्तीने वाहतुकीचे नियम मोडल्यास इंटरनेटवर ते कसं पाहायचं त्याची लिंक सौरभला पाठवली. त्याने ती लिंक उघडून स्वतःच्या गाडीचा नंबर टाकला असता त्याच्या नावावर एका मागोमाग तीन चलान होते. तिन्ही चलानमध्ये नो लायसेन्स आणि नो डॉक्यूमेन्ट्सच्या तक्रारी होत्या. पुरावे म्हणून दाखवण्यात आलेल्या छायाचित्रात सौरभची दुचाकी न दिसता एका तिसऱ्याच व्यक्तीच्या गाडीचा फोटो दिसत होता. त्या व्यक्तीच्या वाहनाचा नंबर निरखून पाहिल्यानंतर सौरभ आणि त्याच्या दुचाकीचा नंबर एकच असल्याचे दिसून आले. याबाबत त्याने वाहतूक पोलिसांशी संवाद साधला. मात्र, पोलिसांना त्याविषयी फारसे सांगता आले नाही. दरम्यान, त्यानंतरही तो वाहतुकीच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करत असून दंड मात्र सौरभच्या नावाने जमा होत आहे.फोर व्हीलर कारला विदाऊट हेल्मेटचा चार्ज

ठाण्याच्या वीरेंद्र गोपीनाथ कदम यांनी दोन वर्षांपूर्वी अर्टिगा कार ठाण्यातून विकत घेतली होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्यामध्ये वाहतूक विभागाने त्यांना ४०० रुपये दंडात्मक रक्कम विदाऊट हेल्मेटसाठी चार्ज, असं लिहिण्यात आलं होतं. याबाबत त्यांनी पोलिसांच्या एमटीपी अॅपवर जाऊन पडताळणी केली असता त्यांच्या फोर व्हीलर कारवर पोलिसांनी विदाऊट हेल्मेटचा चार्ज लावल्याचं दिसून आलं.

घडलेला प्रकार हा हास्यास्पद असून बहुधा हा चार्ज चुकीचा असावा किंवा चार्ज लावताना पोलिसांना डुलकी तरी लागली असावी. तरी हे चलान चुकीचे असल्याचं सिद्ध करण्यासाठी आता वारंवार वाहतूक पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागत आहेत. यामुळे वेळ वाया जात असून नाहक त्रास होत असल्याचं वीरेंद्र कदम यांचा मुलगा सार्थकने 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.


बनावट नंबरप्लेटमुळे घोळ

शहरात ई-चलानने दंडात्मक रक्कम भरण्यास सुरुवात झाल्यापासून त्या कारवाईपासून वाचण्यासाठी अनेकजण दुसऱ्याच्या नावाची नंबरप्लेट स्वतःच्या गाडीला लावून वापरत आहेत. पोलिस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकाच्या गाडीचा नंबर पाहून त्याच्या नावाने चलान फाडत आहेत. अशाच प्रकाराला बळी पडल्याचा दावा सौरभ आणि सार्थक करत असून दिवसागणिक वाढत असलेला भुर्दंड रोखण्यासाठी दोघेही वाहतूक पोलिस आणि आरटीओकडे दाद मागणार आहेत.हेही वाचा

एकाच नंबर प्लेटच्या दोन बस जप्त


संबंधित विषय