COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,17,121
Recovered:
56,54,003
Deaths:
1,12,696
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,390
575
Maharashtra
1,47,354
9,350

दाऊदला मोठा झटका, रत्नागिरीतल्या तीन मालमत्तांचा लिलाव

दाऊदचा विश्वासू इक्‍बाल मिर्चीच्या मुंबईतील दोन फ्लॅटचा लीलाव झाला नाही.तीन वेळा सफेममार्फत या मालमत्तेचा लीलाव करण्यात आला. पण ही मालमत्ता खरेदी करण्याठी त्यावेळी कोणीही उत्सुकता दाखवली नाही.

दाऊदला मोठा झटका, रत्नागिरीतल्या तीन मालमत्तांचा लिलाव
SHARES

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या यांच्या रत्नागिरीच्या दोन वडीलोपार्जीत मालमत्तांचा लिलाव मंगळवारी झाला. या मालमत्तांसाठी १.१० कोटी बोली लागली. दाऊदचा विश्वासू इक्बाल मिरची यांचा मालमत्तांसाठी सलग तिसऱ्यांदा कोणीही उत्सुकता दाखवली नाही. स्मग्लर्स अँड फॉरेन एक्‍सचेंज मॅनीपुलेशन ऍक्‍ट(सफेमा) अंतर्गत हा लिलाव पार पडला.

हेही वाचाः- ‘जलयुक्त शिवार’ची खुली चौकशी, ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

रत्नागिरीतील खेड येथील या तीन  मालमत्ता असून त्यात एका पेट्रोल पंपचा समावेश आहे. हा पेट्रोल पंप दाऊदची बहीण हसीना पारकरच्या नावावर आहे. या तीनही मालमत्ता रत्नागिरीतील व्यावसायिक रवी काटे यांनी एक कोटी १० लाखाला खरेदी केल्या. या लिलावात काटेंसह दोघे सहभागी झाले होते. पण दुसरा व्यक्तीने शेवटच्या क्षणी तांत्रिक कारणामुळे माघार घेतली. दरम्यान दाऊदचा विश्वासू इक्‍बाल मिर्चीच्या मुंबईतील दोन फ्लॅटचा लीलाव झाला नाही.तीन वेळा सफेममार्फत या मालमत्तेचा लीलाव करण्यात आला.  पण ही मालमत्ता खरेदी करण्याठी त्यावेळी कोणीही उत्सुकता दाखवली नाही. सफेमाने या मालमत्तेची बेस किंमत तीन कोटी ४५ लाख रुपये निश्‍चित केली होती. ही बेस किंमत अधिक वाटल्यामुळे कोणीही मालमत्ता खरेदी करण्यासाठी बोली लावली नाही. सांताक्रुझ येथील उच्चभ्रू जुहू तारा रोडवर ही मालमत्ता आहे. तेथील मिल्टन कॉ. हा.सो. मध्ये ५०१ व ५०२ हे दोन फ्लॅट आहेत. त्यांचे क्षेत्रफळ १२०० चौ.फुट आहे.

हेही वाचाः- कंगनाला उत्तर देणार का? उर्मिला मातोंडकर म्हणाल्या…

नोव्हेंबर महिन्यात सहा मालमत्तांचा लिलावची घोषणा केली होती.  पण तांत्रिक कारणामुळे एका मालमत्तेचा लीलाव होऊ शकला नाही. दाऊदच्या कुटुंबियांशी संबंधी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे या मालमत्ता आहेत. त्याती सहा मालमत्ता मुम्बाके या गावात आहेत. त्यात २७ गुंठे जमीन, २९.३० गुंठे जमीन, २४.९० गुंठे जमीन, २० गुंठे जमीन, १८ गुठे जमीन तसेच २७ गुठे जमिनीसह एक घर अशा सहा मालमत्ता होत्या. त्यांचा लिलाव करण्यात आला होता. पण खेड परिरातच लोटे येथेही ३० गुंठ्यांची एक जागा आहे. तिचा लिलाव तांत्रिक कारणामुळे होऊ शकला नव्हता.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा