मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा, तुम्हचीही होऊ शकते फसवणूक

कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील सर्व माहिती सायबर भामट्यानां मिळते . त्याचा उपयोग हे भामटे एक तर अशा नागरिकांना त्रास देऊन खंडणी मागण्यासाठी करत असतात किंवा अन्य आर्थिक गुन्हा करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात.

मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा, तुम्हचीही होऊ शकते फसवणूक
SHARES

सध्याच्या काळात बरेच नागरिक इंटरनेटचा वापर मोफतमध्ये ऑनलाईनवर विविध प्रकारचे चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाउनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने ते तुम्हची फसवणूक करू शकतात. त्यामुळे नागरिकांनी कोणतेही  अँप डाऊनलोड करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर करण्याऱ्या व्यक्तींची संख्या वाढत आहे . या मधील सायबर भामटे लोकांच्या याच सवयीचा फायदा घेत आहेत . जेव्हा एखादी व्यक्ती अशा फ्री वेबसाईटवर क्लिक करते तेव्हा त्या  वापरकर्त्याच्या न कळत एखादे मालवेअर (malware) डाउनलोड होते व ते तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील सर्व माहिती सायबर भामट्यानां पाठवते . त्याचा उपयोग हे भामटे एक तर अशा नागरिकांना त्रास देऊन खंडणी मागण्यासाठी करत असतात किंवा अन्य आर्थिक गुन्हा करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात.

मलबार हिल येथे राहणा-या व्यावसायिकाला १९ मेला एका महिलेच्या इस्टाग्राम खात्यावरून संदेश आला होता. त्यात व्हिडिओ कॉल सर्विस पुरवण्यात येते, असा नमुद करण्यात आले होते. त्यानंतर या मिलेने एक अश्लील व्हिडिओ या व्यावसायिकाला पाठवला. त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर तक्रारदाराला व्हिडिओ कॉल आला. त्यात महिला नग्न अवस्थेत एक महिला बसलेली होती. १० सेकंद चाललेल्या या दूरध्वनीनंतर तक्रारदाराला खंडणीसाठी दूरध्वनी येऊ लागले. सुरूवातीला २० हजार भरल्यांनतर या व्यावसायिकाच्या पत्नीलाही आरोपीचे दूरध्वनी येऊ लागले. तिनेही बदनामीच्या भीतीने २० हजार रुपये दिले. पुढे  तक्रारदार व्यावसायिकाच्या नावाने बनावट इस्टाग्राम खाते तयार करून त्यावर हा व्यक्ती अश्लील कॉल सर्विसचा वापर करत असल्याचे आरोपीने नमुद केले होते. हा संदेश व्यावसायिकाच्या ओळखीच्या व्यक्तीने पाहिल्यानंतर त्याला बाबत माहिती दिली. व्यवसायिकाने याबाबत पडताळणी केली असता संबंधीत इस्टाग्राम खाते एक पुरुष दिल्लीतून हाताळत असल्याची माहिती समजली. अखेर या व्यवसायिकाने याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार सायबर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

वेबसाईट व त्यावरील चित्रपट सूची

 महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कृपया अशा मोफत वेबसाईटवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळा . जर तुम्ही अशी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज  डाउनलोड केली असेल व ती तुम्हाला प्ले करायच्या आधी काही परवानगी मागत असेल तर अशी परवानगी  देऊ नका आणि ती फाईल  रद्द (delete) करा . शक्यतो अधिकृत व खात्रीलायक  वेबसाईटवरूनच चित्रपट किंवा वा वेब सिरीज पहा. त्याला काही शुल्क असेल तर ते भरा . तुमच्या मोबाईल व कॉम्प्युटर मध्ये latest antivirus सॉफ्टवेअर install करा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा