एका फ्लॅटवर दोन कर्ज? पोलिसांनी घेतलं बिल्डरला ताब्यात

बँकांना ठकवल्याची लहानमोठी प्रकरणं सातत्याने बाहेर येत आहेत. असंच एक प्रकरण नुकतंच आझाद मैदान पोलिसांनी नोंदवलं असून एका नामांकीत बँकेला ४७ लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाला शनिवारी अटक केली आहे.

एका फ्लॅटवर दोन कर्ज? पोलिसांनी घेतलं बिल्डरला ताब्यात
SHARES

'पुढच्याला ठेच, मागचा शहाणा' ही म्हण मराठीत बरीच प्रचलित असली, तरी भारतीय बँकांच्या बाबतीत मात्र ही म्हण तितकीशी लागू पडताना दिसत नाही. कारण बँकांना ठकवल्याची लहानमोठी प्रकरणं सातत्याने बाहेर येत आहेत. असंच एक प्रकरण नुकतंच आझाद मैदान पोलिसांनी नोंदवलं असून एका नामांकीत बँकेला ४७ लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पृथ्वी बिल्डरचे लक्ष्मीकांत शहा आणि एका लोन एजंटला रविवारी अटक केली आहे.


काय आहे प्रकरण?

पुण्यातील हवेली जिल्ह्यातील घोरपडी इथं पृथ्वी गार्डन्स या संकुलातील एका ड्युप्लेक्स फ्लॅटवर ठाण्यातील व्यावसायिक अजय धवन आणि त्यांचे वडील पवन धवन यांनी फोर्ट इथल्या बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून कर्ज घेतलं होतं. काही वर्षे त्यांचे नियमित घराचे नियमित हप्ते भरले. पण हप्ते थकवल्यानंतर त्यांना बँकेकडून नोटीस पाठवण्यात आली. तिचं उत्तर न दिल्याने बँकेने हा फ्लॅट ताब्यात घेण्याचं ठरवलं. तेव्हा या फ्लॅटवर दुसऱ्याच बँकेचा ताबा असल्याचं स्पष्ट झालं.


पितापुत्रांना अटक

बँकेच्या अधिकाऱ्यांनी धवन पितापुत्राची कागदपत्रे तपासून बघितल्यावर त्यांनी बँकेला सादर केलेलं खरेदीखत आणि इतर कागदपत्रं बनावट असल्याचं आढळून आलं. याप्रकरणी बँकेने ४ जुलै २०१७ रोजी आझाद मैदान पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर नोव्हेंबर २०१७ मध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं.


दुसऱ्यानेही कर्ज थकवलं

त्यांच्या चौकशीतून लोन एजंट जितेंद्र गांधी याचं नाव पुढे आलं. या फ्लॅटवर कर्ज मिळवून देण्यासाठी २०१२ मध्ये लक्ष्मीकांत शहा यांनी विश्वासातील लोन एजंट जितेंद्र गांधी याला या फ्लॅटचे पेपर सही करुन दिले होते. तर स्वत: देखील एका बँकेकडून कर्ज घेतलं होतं. मात्र ते कर्जदेखील न फेडल्याने बँकेने हा फ्लॅट ताब्यात घेतला होता.


चौकशी सुरू

त्यानुसार पोलिसांनी पुण्यातून शहा आणि गांधी यांना रविवारी ताब्यात घेतलं. शहा याची चौकशी केल्यावर आपण कर्ज घेतलं नसल्याचं शहा म्हणत असला, तरी त्याच्या आयसीआयसीआय बँकेच्या ऐरोली शाखेत कर्जाचे पैसे वळते झाल्याचा तपशील पोलिसांच्या हाती लागला अाहे. याबाबत पोलिस सत्यता पडताळत असून याप्रकरणी अजून चौकशी सुरू असल्याची माहिती आझाद मैदान पोलिस सूत्रांनी दिली.



हेही वाचा-

पीएनबी घोटाळ्यात आणखी 5 जणांना अटक

३० कोटी अन् महागडी घड्याळं, नीरव मोदीच्या संपत्तीवर धाडी सुरूच



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा