पैशाच्या हव्यासापोटी बाळ दुरावले

  मुंबई  -  

  सीएसटी - अवघ्या तीन महिन्यांचे तान्हे बाळ. बाळाचे रडणे ऐकून कुणाचेही हृदय हेलावेल. गेल्या सहा दिवसांपूर्वी श्रेयस आपल्या आईपासून दुरावला होता. श्रेयसच्या विरहामुळे त्याच्या आईचे अश्रू काही थांबायचे नाव घेत नव्हते. पण बाळाच्या दुराव्याला कारणीभूतही आईच आहे. प्रसिद्धी आणि पैशाच्या हव्यासापोटी आई आपल्या मुलापासून दुरावली. मात्र पोलिसांमुळे सहा दिवसांच्या विरहानंतर आई आणि बाळाची भेट झाली.

  29 सप्टेंबर... हाच तो काळा दिवस ज्या दिवशी श्रेयसचे अपहरण झाले. शूटिंगच्या नावाखाली या तीन महिन्याच्या बाळाचे चर्चगेट स्टेशनजवळून अपहरण झाले. संजना बोबडे या महिलेने प्रसिद्धी आणि पैशाच्या हव्यासापोटी आपल्या पोटच्या गोळ्याला एका अनोळखी हातामध्ये सोपवले. 15 हजारांच्या सौद्यावर सनी आणि पंकजला या दोघांना आपले बाळ शूटिंगसाठी दिले. मात्र बाळाला घेऊन दोघेही परतलेच नाहीत. त्यानंतर अखेर संजनाने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानंतर तिघांना अटक केली. यात सुत्रधार आशा हेगडे या महिलेचाही समावेश आहे.

  सर्वात गंभीर म्हणजे आशा हेगडे हिने बाळाचे अपहरण करण्याचे कारण धक्कादायकच आहे. आशाला चार मुली होत्या. पण मुलाच्या हव्यासापोटी तिने अपहरणाचा कट रचला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.