करण जोसफ आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल


करण जोसफ आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल
SHARES

उद्योन्मुख संगीतकलाकाराच्या आत्महत्ये प्रकरणी अखेर वांद्रे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. झोन नऊचे डीसीपी परमजीत सिंह दहिया यांनी गुन्हा नोंदवल्याचे सांगितले असून सगळ्या बाजूने पोलीस तपास करत असल्याचे ते पुढे म्हणाले.

वडील थॉमस जोसेफ यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी बँडस्टँड येथील कोंकोर्ड इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी घेत करण जोसेफ नावाच्या पियानो वाजवणाऱ्या मुलाने आत्महत्या केली होती.

मूळचा बंगळुरुचा असलेला करण अवघ्या महिन्याभरापूर्वीच मुंबईत आला होता. त्याच्या अशा एकाएक आत्महत्या करण्याने त्याच्या घरच्यांसह मित्रानाही धक्का बसला आहे.


करण हा त्याचा मित्र ऋषी शाह याच्या घरी रहात होता. करण सोबतच ऋषीची ऑस्ट्रेलियातील मैत्रिण सुजाना उष्मा देखील त्याच घरात रहात होती.  मुंबईत छोट्या मोठ्या हॉटल आणि पार्टीमध्ये तो पियानो वाजवत असे. संगीतकार विशाल ददलानीसोबतही त्याने काम केले होते. गेल्या काही दिवसांपासून करण हा तणावाखाली असल्याचे त्याच्या बंगळुरूमधील मित्रांनी संगितले. काही दिवसांपूर्वीच त्याला मारहाण झाल्याचे देखील त्याने आपल्या मित्रांना सांगितले होते. पण त्यांनी काही हालचाल करण्याच्या आतच त्याने आत्महत्या केली.


हेही वाचा - 

...या म्युझिशियनने का केली आत्महत्या?


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा