भायंदर - बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे सर्व्हर हॅक करून करोडो रुपये काढल्याचा आरोप भायंदरमधील 22 जणांवर बँकेने केला आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी जसवंत दमानिया, जसवंतचा मुलगा राज प्रितेश,प्रतीक पुजारी,भरत गवले आणि औरंगाबादमधील दीपक याच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 26 डिसेंबर 2016 ते 18 जानेवारी 2017 दरम्यान या आरोपींनी एका अॅपचा वापर करत 142 वेळा बँकेचा व्यवहार केल्याचा बँकेने आरोप केला आहे. बँकेला जेव्हा हा सगळा प्रकार लक्षात आला तेव्हा बँक कर्मचाऱ्यांनी पोलिसांत धाव घेतली.