मुंबईत दोन बेस्ट बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

वेर्स्टन एक्स्प्रेस हायवेच्या गोरेगाव चेक नाका पुलावर ही घटना घडली.

मुंबईत दोन बेस्ट बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
SHARES

मुंबईत (Mumbai) आज पहाटे घडलेल्या बेस्ट बसचा (BEST Bus) भीषण अपघात (Accident) झाला. बेस्टच्या दोन बस आणि एका ऑटोरिक्षा (Autorickshaw) यांच्यात झालेल्या भीषण धडकेत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या (wastern Express Highway) गोरेगाव चेक नाका पुलावर ही घटना घडली. जॉनी संखाराम (वय 42 वर्षे) आणि सुजाता पंचकी (वय 38 वर्षे) अशी मृतांची नावं आहेत.

एक बस घसरुन आधी दुसऱ्या बसला, मग रिक्षाला धडकली

या अपघातात बस क्रमांक 1453 (एमएच 01 एपी 0226) आणि बस क्रमांक 1862 (एमएच 01 एपी 0746) या दोन्ही बस आगार ट्रान्सफरसाठी पोईसर डेपोहून घाटकोपर डेपोकडे जात होत्या. संतोष विष्णू देवूलकर (53) हे बस क्रमांक 1453 चालवत होते, तर बस क्रमांक 1862 संतोष शंकर घोंगे (45) हे चालवत होते.

पहाटे पावणे दोनच्या सुमारास, बस क्रमांक 1862 च्या चालकाने ब्रेक लावला आणि बस क्रमांक 1453 च्या चालकालाही असं करण्यास सांगितलं. मात्र मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते निसरडे झाले असल्याने, बस क्रमांक 1453 घसरली आणि आधी बस क्रमांक 1862 आणि नंतर ऑटोरिक्षाला (एमएच 02 ईक्यू 9371) धडकली.

रिक्षातील दोन्ही प्रवाशांचा मृत्यू, चालकाला किरकोळ दुखापत

या अपघातात ऑटोरिक्षातील जॉनी संखाराम आणि सुजाता पंचकी हे प्रवासी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र जॉनी संखाराम यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच पहाटे पावणे तीन वाजता मृत घोषित करण्यात आलं. सुजाता पंचकी यांना अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं, जिथे पहाटे पावणे चार वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

तर रिक्षाचालकाच्या डाव्या गालाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत. 

मुंबईत हिट अँड रन प्रकरण

मुंबईत चालकाने ब्रेक लावण्याऐवजी चुकून ऐक्सलेटर दाबल्यामुळे भीषण अपघात झाला आणि यात 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना 28 जून रोजी घडली होती. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला होता. मुंबईतील मुलुंड परिसरात हा अपघात झाला.

अपघातानंतर कार चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपी अमरीश यादव महाविद्यालयीन विद्यार्थी असून तो 22 वर्षांचा आहे. आरोपीने दिलेल्या जबाबानुसार, ब्रेक लावण्याऐवजी गोंधळून एक्सलेटर दाबल्यामुळे गाडीचा वेग वाढला आणि त्यातच हा अपघात झाला. अपघातानंतर घाबरुन गेल्याने कार तिथच सोडून पळ काढल्याचंही चालकाने सांगितलं.हेही वाचा

मुलुंडमध्ये हिट अँड रुची घटना, कारच्या धडकेत स्कुटीचे 3 तुकडे

कांदिवली : सफाई कामगाराच्या अंगावरून कार गेल्याप्रकरणी दोघांना अटक


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा