विलेपार्ले पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार

घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ घडलेल्या घटनेसंदर्भात गुन्हा नोंदवला. कुठला ही पुरावा नसताना सुद्धा अतिशय कसोशीने या चोरीच्या प्रकारणाचा तपास पोलिसांनी सुरु केला.

विलेपार्ले पोलीस ठाण्याला सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार
SHARES

कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे सह-आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी उकृष्ट कामगिरी करणा-या पोलिस व पोलिस ठाण्यांना पुरस्कार देण्यास सुरूवात केली आहे.  या संकल्पने अंतर्गत विलेपार्ले पोलिस स्टेशनला यंदा मार्च महिन्यात एका सराफाचे चोरीला गेलेले मौल्यवान दागिने पून्हा मिळवून देत,आरोपीला बेड्या ठोकल्या प्रकरणी सर्वोत्कृष्ट मालमत्ता हस्तगत पुरस्कार मिळाला आहे. 

हेही वाचा-कोरिओग्राफर रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका

फेब्रुवारी महिन्यात विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची एक घटना घडली होती. त्यात २१ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. घरात कोणीही नसताना चोरटे घराचे कुलुप तोडून आत शिरले आणि चोरी करून पसार झाले होते. चोरी एवढ्या हातसफाईने केली होती की, चोरीचा कुठलाही पुरावा त्यांनी सोडला नव्हता. विलेपार्ले परिसर हा शांत आणि सुसंस्कृत लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे चोरीच्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ घडलेल्या घटनेसंदर्भात गुन्हा नोंदवला. कुठला ही पुरावा नसताना सुद्धा अतिशय कसोशीने या चोरीच्या प्रकारणाचा तपास पोलिसांनी सुरु केला.

हेही वाचाः- ठाकरे सरकारची नवी परीक्षा, राज्यात १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान

 पोलीस उपायुक्त मंजूनाथ शिंगे यांच्या आदेशानुसार, विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे याच्या नेतृत्वाखाली या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले. पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक नेमण्यात आले. तपास करत असताना गुप्त माहितदारांकडून छोटासा सुगावा पोलिसांना लागला. तोच धागा धरत साहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड यांनी अतिशय सखोल निरिक्षण करून सर्व केंद्रबिंदू जोडले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड आपल्या सोबत पोलीस नाईक पडवळ, महाडेश्वर, पोलीस शिपाई कांबळे यांना घेऊन उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले. तिथून विकास उर्फ राजा अनिल सिंह आणि अंगद कश्यप या आरोपींना अटक करत त्यांच्याकडून १८ लाख १७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आणि रक्कम जप्त केली. कुठला ही सुगावा नसतानासुद्धा केलेल्या या तपासाबद्दल वरीष्ठ पोलीस निरीक्षक अलका मांडवे, पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर डोईजड, पोलीस नाईक पडवळ, महाडेश्वर नाईक पोलीस शिपाई कांबळे यांना रोख रक्कम १५ हजार आणि प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा