माझगावच्या सिताफळवाडीत 10 कोटींची वीजचोरी

  मुंबई  -  

  वीजचोरी प्रकरणी बीईएसटीच्या दक्षता विभागाचे मुख्य अधिकारी आर. जे. सिंह यांनी दक्षता पथकासह  माझगावच्या सिताफळवाडीतल्या बॉम्बे टी स्ट्रेनिंग एमएफजी कंपनीवर शुक्रवारी धाड टाकली. बीईएसटीच्या थेट मिटरबॉक्समधून परस्पर वीज जोडणी करून वीजेची चोरी केली जात असल्याची माहिती बीईएसटीच्या दक्षता विभागाला मिळाली होती. त्यानंतर दक्षता विभागाचे मुख्य अधिकारी आर. जे. सिंह यांनी दक्षता पथकासह धाड टाकली. यामध्ये बेस्टला 176 किलोवॅट इतक्या वीजेचे म्हणजेच 10 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर तिसऱ्या विद्युत प्रवाह करणाऱ्या मिटरबॉक्समधूनही वीजचोरी झाली आहे का? याचा तपासही सध्या बीईएसटीच्या दक्षता पथकाकडून सुरू आहे. भायखळा पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार नोंदवण्यात आली आहे.


  हे देखील वाचा

  माहिमच्या स्टेटस् रेस्टॉरंटची 4 कोटी 55 लाखांची विजचोरी उघडकीस; दोघांविरोधात गुन्हा दाखल


  बीईएसटीच्या दक्षता पथकाने महिन्याभरापूर्वी माहिम परिसरातल्या कटारिया मार्गावरील स्टेटस् गॉरमेट रेस्टॉरंट आणि बँक्वेट हॉलवर धाड टाकली होती. या धाडीमध्ये स्टेटस् रेस्टॉरंटने गेल्या दहा वर्षांत सुमारे 4.55 कोटी रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आले होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.