सायबर फसवणुकीदारांपासून रहा सावधान, मुंबई पोलिसांनी केलं आवाहन


सायबर फसवणुकीदारांपासून रहा सावधान, मुंबई पोलिसांनी केलं आवाहन
SHARES

मुंबईत लाँकडाऊन दरम्यान नागरिकांमध्ये इंटरनेटचा वापर वाढला होता. याच संधीचा फायदा घेऊन सायबर चोरांनी विविध क्लुप्त्या लढवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. कधी बँकेतून बोलतोय असे सांगून, तर कधी लोणच्या नावाखाली, तर कधी पेंशनच्या नावाखाली लिंक पाठवून नागरिकांची आँनलाईन फसवणूक करत होते. या लाँकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा वर्गाला नोकरीचे आमीष दाखवून आता सायबर चोरांनी फसवणूक करण्यास सुरू केल्याचे लक्षात आल्यानंतर अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचाः- राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी, ठाकरे सरकारचा निर्णय

कोरोना महामारीमुळे देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचे संकट निर्माण झाले आहेत. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून सोशल मिडियावरील (Social Media) अफवांचे प्रमाणही वाढले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, देशात अनलॉकला सुरुवात झाली असून अनेकजण चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) घरी बसून पैसे कमवण्याच्या जाहिराती येऊ लागल्या आहेत. मात्र अशा खोट्या मेसेजेसला बळी पडू नका असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.

हेही वाचाः- ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना भारतात बंदी

व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या या मॅसेजमध्ये पार्टटाईम नोकरीची संधी चालून आल्याचा दावा केला जात आहे. या कामाच्या माध्यमातून एका दिवसात २००-३०० रुपये कमवता येणार आहे. एवढेच नव्हेतर दिवसात केवळ दहा ते तीस मिनिटेच काम करावे लागणार आहे. तसेच या मॅसेज खाली दिलेल्या लिंकवर वापरकर्त्यांना नाव नोंदवण्यास सांगितले जात आहे. नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला ५० रुपये मिळतील, असे सांगून खाली एक लिंक दिलेली आहे. या लिंकमध्ये बँकेच्या खात्याविषयी माहितीही दिलेली असते. नकळत तरुणांकडून ती माहिती भरली गेल्यास त्यांच्या खात्यातून काही मिनिटात पैसे  काढले जात आहेत. त्यामुळे अशा आमीषांना बळी पडू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधील सायबर गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त (डीसीपी) रश्मी करंदीकर यांनी नागरिकांना केले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा